ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वास्तुशास्त्रीतील नक्षत्रयोग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 02:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वास्तुशास्त्रीतील नक्षत्रयोग

शहर : मुंबई

जे आपल्या जागेवर स्थिर असतात त्यांना नक्षत्र म्हणतात. ज्याप्रमाणे पृथ्वीचे अंतर किलोमीटरमधे मोजले जाते त्याचप्रमाणे सूर्यमालेतल्या ग्रहांची अंतरे नक्षत्रांच्या मदतीने मोजली जातात.

पृथ्वीबरोबरच सूर्यमंडलातील अन्य ग्रह सुर्याभोवती परिभ्रमण करतात. या प्रदक्षिणेचा मार्ग अंडाकार पट्ट्याप्रमाणे आहे. त्यालाच भ्रमणचक्र म्हणतात. हा असंख्य तार्यांचा समुच्चय आहे. ते स्वयंप्रकाशित असतात. ते एका विशिष्ट आकृतीत चमचमतात यांनाच नक्षत्र म्हणतात.

नक्षत्रांची नावे

त्यांच्या वेगवेगळ्या आकृत्यांच्या आकारावरून त्यांची नावे ठेवली आहेत. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुण्य, आश्लेषा, मघा, उत्तरा, हस्त, पूर्वा, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, मूळ, पुर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तरभाद्रपदा, रेवती ही २७ नक्षत्रे आहेत. अभिजीत हे 28 वे नक्षत्र मानण्यात येते. उत्तराषाढाची शेवटची 15 घटिका आणि श्रवण नक्षत्रांच्या सुरुवातीला 4 घटिका या प्रकाराने 19 घटकांचे अभिजात नक्षत्र मानले जाते. ही नक्षत्रे सर्व कार्यांसाठी शुभ मानली जातात. भ्रमणचक्र 360 अंशाचे आहे. त्याला 27 भागात विभागले आहे.

ज्याचा प्रत्येक भाग 13 अंश 33 कलांचा असतो. त्याला एक नक्षत्र मानले जाते. प्रत्येक नक्षत्रांचे स्वतः:चे एक निश्चित क्षेत्र असते. ज्याला समान 4 चरणात 3 अंश 33 कलांमध्ये वेगळे केल्यावर त्या भागाला नक्षत्रांचे एक चरण मानतात. म्हणजे 3 अंश 33 कलांच्या चार भागांपासून एक संपूर्ण नक्षत्र तयार होते.

स्थापत्य वेदात नक्षत्राचे महत्त्व

ज्यावेळी बालकाचा जन्म होतो त्या वेळी असणार्या नक्षत्राचा प्रभाव त्याच्या अंतापर्यंत राहतो. ह्या नक्षत्राच्या स्वभावानुसार, गुण, आकृती यानुसार त्या व्यक्तीचा चेहरा, स्वभाव, त्याचा व्यवसाय आदी गोष्टी ठरतात. घर व्यवस्थापन किंवा घरबांधणी पण अशा तर्हेने केली जावी की त्याची शुभ अनुकूल फळे व्यक्तीच्या नक्षत्रानुसार मिळावीत. म्हणून घर बांधताना जमिनीची निवड, भूमिपूजन, मुख्यद्वाराचे बसविणे, रंगाचे नियोजन, गृह-प्रवेश ही सर्व कामे नक्षत्रानुसारच पार पाडावीत.

महादशा (साडेसाती)

जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचा स्वामीची महादशा जन्माच्या वेळी असते. महादशेच्या काळात व्यक्तीची ज्या ग्रहाची साडेसाती चालू असते तिलाच जन्माच्या वेळेची महादशा मानले जाते. या नुसार जातकाचे वय 120 वर्षे मानले गेले आहे. नक्षत्र स्वामी ग्रह-जन्म पत्रिकेच्या स्थितीनुसार शुभ अशुभ परिणाम होतात.

ग्रह                                    महादशेची वर्षे

सूर्य                                          06

चंद्र                                         10

मंगळ                                       07

बुध                                         17

शुक्र                                        20

गुरु                                         16

शनि                                      19

राहू                                      18

केतू                                      07

नक्षत्रांचे स्वामी

नक्षत्र                                        स्वामी

कृतिका, उत्तरा, उत्तराषाढा                  सूर्य

रोहीणी, हस्त, श्रवण                           चंद्र

मृग, चित्रा, घनिष्ठा                          मंगळ

अश्लेषा, ज्येष्ठा, रेवती                         बुध

भरणी, पूर्वा, पूर्वाषाढा                        शुक्र

पुनर्वसु, विशाखा                              गुरु

पुष्य, अनुराधा, उत्तराभाद्रपद                शनि

आर्द्रा, स्वाती, शततारका                     राहू

अश्विनी, मघा, मूळ                           केतु

 

 

मागे

शेतक-यांना महा डी.बी.टी.द्वारे १३ योजनांचा लाभ एकाच क्लिकवर - डॉ. अनिल बोंडे
शेतक-यांना महा डी.बी.टी.द्वारे १३ योजनांचा लाभ एकाच क्लिकवर - डॉ. अनिल बोंडे

राज्यातील शेतक-यांसाठी महाराष्ट्र कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्....

अधिक वाचा