ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

राशीभविष्य - 24 एप्रिल 2019

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 10:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

 राशीभविष्य - 24 एप्रिल 2019

शहर : मुंबई

मेष

आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर काम आणि चांगल्या संबंधात बिघाड येईल. मानसिक व्यग्रता आणि मनाची बेचैनी यामुळे तुमचे कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती स्वास्थ्य नरमच असेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल.

वृषभ

शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. नवीन काम सुरू करू नका. योग्य अयोग्य बघूनच खाणे पिणे ठेवा. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्यापेक्षा योग, ध्यान, आध्यात्मिकता यात मन गुंतवा.

मिथुन

श्रीगणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्या बरोबर एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. तुमच्या मान- सन्मानात व लोकप्रियतेत वाढ होईल.

कर्क

श्रीगणेश म्हणतात की व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचा आज तुमच्या बरोबरचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.

सिंह

श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात प्रगतीचा. स्नेही, मित्र यांच्या गाठीभेटी होतील. तब्येत चांगली राहील. तरीही रागावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकेल.

कन्या

आजचा दिवस प्रतिकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर भांडण होईल किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी लागेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहा.

तूळ

आजचा दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी असेल. धार्मिक प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपापसातील संबंध सुधारतील.

वृश्चिक

आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आपल्या वागण्यापातून कोणाचे मन दुखावले जाईल. म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्जनामध्ये विद्यार्थ्यांना अडथळा येईल.

धनु

आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी गप्पागोष्टी होऊन मन प्रसन्न राहील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल.

मकर

आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येतील. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह आणि प्रसन्नता नाहीशी होईल. अपघात व ऑपरेशन पासून सांभाळून राहा. कष्टाच्या मानाने फळ मिळणार नाही म्हणून निराश व्हाल.

कुंभ

आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात आज लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल. त्यांच्या बरोबर प्रवासही ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुंना आशादायक.

मीन

व्यवसाय धंद्यात लाभाचा दिवस. आपल्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. पदोन्नतीचे योग आहेत. व्यापार्‍यांना व्यापारातून लाभ. तसेच व्यापारात वाढ. पित्याकडून लाभ. कौटुंबिक वातावरण आनंदाचे. मान प्रतिष्ठा उंचावेल.

 

 

मागे

राशीभविष्य - 23 एप्रिल 2019
राशीभविष्य - 23 एप्रिल 2019

मेष नवीन कामाला सुरुवाता करण्याचा गणेशजींचा सल्ला आहे. गूढ विद्या तसेच रह....

अधिक वाचा

पुढे  

राशीभविष्य - 25 एप्रिल 2019
राशीभविष्य - 25 एप्रिल 2019

मेष आज आपण आपला संताप काबूत ठेवा असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही कामात व्य....

Read more