ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गृह प्रवेश करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, जाणून घ्या शुभ तिथी, नक्षत्र आणि वार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गृह प्रवेश करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, जाणून घ्या शुभ तिथी, नक्षत्र आणि वार

शहर : मुंबई

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. गृह प्रवेश करताना या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. गृह प्रवेश मुहूर्तामध्ये नक्षत्र, तिथी, वार आणि लग्नचा विशेष विचार केला जातो. या 4 गोष्टी लक्षात घेऊन गृह प्रवेश करणे लाभदायक राहते. येथे जाणून घ्या, गृह प्रवेशासाठी शुभ नक्षत्र, तिथी, वार आणि लग्न कोणते आहेत...

शुभ नक्षत्र -: उत्तराफाल्गुनी, उत्तराआषाढा, उत्तराभाद्रपद, रोहिणी, मृगशिरा, चित्रा, अनुराधा आणि रेवती नक्षत्र गृह प्रवेशासाठी शुभ आहेत.

शुभ तिथी -: शुक्ल पक्षातील द्वितीय, तृतीया, पंचमी, षष्टी, सप्तमी, दशमी, एकादशी आणि त्रयोदशी तिथी गृह प्रवेशासाठी शुभ मानली जाते.

शुभ वार -: गृह प्रवेशासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार शुभ आहेत.

शुभ लग्न -:  वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीचे लग्न उत्तम आहेत. मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीचे लग्न मध्यम आहेत. लग्नेश बली, केंद्र त्रिकोणात शुभ ग्रह आणि 3, 6, 10 आणि 11 व्या स्थानात पाप ग्रह असावेत.

या गोष्टींकडेही द्यावे लक्ष...

1. रिक्ता तिथी (चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी) तसेच शनिवारी गृह प्रवेश करू नये.

2. गृह प्रवेश करण्यापूर्वी वास्तू पूजन आवश्यक आहे.

3. वास्तू पूजेनंतर ब्राह्मणांना जेवू घालावे.

4. नवीन घरामध्ये तुळशीचे रोप लावावे. यामुळे शुभफळ प्राप्त होतात.

5. घराच्या मुख्य दरवाजाजवळ शुभ चिन्ह उदा. ऊं, स्वस्तिक काढावे.

6. शुभ मुहूर्तामध्ये कुटुंबियांसोबत मंत्रोच्चार करत शंख वाजवत गृह प्रवेश करावा.

 

 

 

मागे

घरातील छोट्या-छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतात वास्तुदोष
घरातील छोट्या-छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतात वास्तुदोष

वास्तू शास्त्रामध्ये नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्य....

अधिक वाचा

पुढे  

प्लॉटसाठी वास्तूचे नियम, एकाकडे ही करू नका दुर्लक्ष
प्लॉटसाठी वास्तूचे नियम, एकाकडे ही करू नका दुर्लक्ष

आजच्या युगात प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की त्याच्याजवळ त्याचा मालकीचे ....

Read more