ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

वास्तुशास्त्रातील महत्त्वाची पंचमहाभूते

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 03:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वास्तुशास्त्रातील महत्त्वाची पंचमहाभूते

शहर : मुंबई

मनुष्य आपल्या प्रकृतीशी मिळत्या जुळत्या परिस्थितीतच सुखी सुरक्षित राहू शकतो आणि आपला विकास करू शकतो. दुसर्या शब्दात सांगावयाचे झाले तर आपले घर किंवा काम करण्याची जागा आपली गरज, सोय किंवा आपल्या इच्छेनुसार बनवू शकतो. पण निसर्गाचा (वातावरण) माणसावर किंवा घरावर प्रत्यक्ष प्रभाव पडतो. त्याला तो नियंत्रित करू शकत नाही. कारण निसर्ग माणसाच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे वास्तुशास्त्रात काही असे निर्देश दिले आहेत की माणसाला स्वत:लाच किंवा घरालाच अशा तर्हेने protect केले पाहिजे. नैसर्गिक शक्ती, उर्जा, सूर्याची किरणे, केंद्रीय शक्ती या गोष्टींचा वाईट परिणाम होऊ नये.

सृष्टीची निर्मिती ज्या 5 तत्वांपासून झाली ती तत्वे म्हणजे, पाणी (जल), जमीन (भू), वारा (वायू), आग (अग्नी) आकाश. यालाच आपण पंच महाभूते असे म्हणतो. कारण पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू ही याच तत्वांपासून बनली आहे. याच पाच तत्वांची एकमेकांशी युती होऊन एक अदृश्य शक्ती तयार झाली आहे. तिलाच आपण नैसर्गिक शक्ती किंवा प्रकृती म्हणतो.

पाणी -: पाणी माणसाचे जीवन आहे, H2 O2 2:1 प्रमाणात जमीन, प्राणी, नदी, तलाव, समुद्र, बर्फ तसेच आर्द्रतेच्या रूपात संपूर्ण पृथ्वीवर पसरलेले आहे.

जमीन - : विस्तृत विवेचन येथे केले आहे.

अग्नी -: जो प्रकाश, उर्जेचा स्त्रोत आहे, आकाशात सूर्य, हवेत वीज, आणि पृथ्वीवर आगीच्या रूपात आहे. सर्व प्रकारची ऊर्जा, सौरऊर्जा, अणूऊर्जा, इतर सर्व प्रकारच्या उष्णता ऊर्जा, तसेच जेवण, जे शरीराला ऊर्जा मिळवून देते, ते शिजवण्याचे एकमात्र साधन अग्नी आहे.

वायू - : पृथ्वीवर वातावरण (हवेचे आवरण) सुमारे 400 km आहे त्यात 21% o2, 78% N2 तसेच Co2M He, आणि वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत. ज्याच आवाज आपण ऐकू शकतो जी हवा आपल्याला जाणवते त्या वायूवर पृथ्वीवरचे सर्व प्राणी, जीव-जंतू, झाड-झुडपे, वृक्ष तसेच आगही अवलंबून आहे.

आकाश - : पृथ्वीवर सर्वत्र जे व्यापलेले आहे. ज्यात सुर्याभोवती फिरणारे ग्रह, सगळी आकाशगंगा, तारे सामावले आहेत ज्यामुळे पृथ्वीवर प्रकाश, उर्जा, उष्णता, थंडी गुरूत्वीय तसेच केंद्रकीय बल मिळते त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव माणसावर पडतो.

वास्तुशास्त्राचा आधारभूत मानलेला ग्रंथ 'समरांगण सुत्रधार' यात त्यांच्या (पंचमहाभूतांच्या) प्रामाणांविषयी सांगितले आहे की पृथ्वीच्या 100 पट पाणी पाण्याचा 100 पट अग्नी, आगीच्या 100 पट वायू आणि वायूच्या 100 पट आकाश आहे.

याच ग्रंथातील श्लोकानुसार माणसाच्या आतील तसेच बाहेरील व्यक्तीमत्वावर, त्याच्या रहाण्याच्या, काम करण्याच्या जागेवर या पाच तत्वांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. त्यामुळे माणसाने या पंचतत्वाचे महत्व जाणून आपल्या घरबांधणीने आपलीपरिस्थिती आपण सुधारू शकतो.

घराची चुकी जागा, चुकीची दिशा किंवा चुकीची बांधणी माणसाच्या कामात विघ्न आणते, चांगले चांगल्या पद्धतीने बांधलेले घर माणसाला सुखी, संपन्न, बुद्धीमान, समृद्ध ठेवते. ह्यात चुक झाली तर दु:, बदनामी, अनावश्यक कर्ज, प्रवास करावे लागतात. त्यामुळेच सर्व घरे, गाव शहरांची निर्मिती वास्तुशास्त्रातील नियमाप्रमाणे व्हायला हवी.

मागे

वास्तुनुसार ग्रहांचा स्वभाव व प्रभाव
वास्तुनुसार ग्रहांचा स्वभाव व प्रभाव

सूर्य - : पुरुष जातीचा, रक्त वर्ण, पित्त प्रकृतीचा, पूर्वेचा स्वामी. हा आत्मा, ....

अधिक वाचा

पुढे  

राशी भविष्य - : Jun 2019
राशी भविष्य - : Jun 2019

मेष हा महिना आपणास मिश्र फलदायी आहे. ह्या महिन्यात आपणास काही फायदे होतील, ....

Read more