ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

दुर्भाग्य आणि गरिबीचे कारण बनू शकते नळातून टपकणारे पाणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 07:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दुर्भाग्य आणि गरिबीचे कारण बनू शकते नळातून टपकणारे पाणी

शहर : मुंबई

आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे, कारण पाण्याशिवाय जीवन शक्य नाहीवास्तू शास्त्रामध्ये पाण्याचा दुरुपयोग गरिबीचे कारण सांगण्यात आला आहे. ज्या घरामध्ये पाण्याच्या चुकीच्या पद्धतीने वापर होतो तेथे देवी लक्ष्मी वास्तव्य करत नाही. येथे जाणून घ्या, पाण्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी.

1. वास्तू शास्त्रानुसार, ज्या घरांमध्ये नळाचे व्यर्थ पाणी टपकत राहते, त्या घरात नेहमी धनाचा अभाव राहतो. नळातून व्यर्थ टपकत राहणाऱ्या पाण्याचे आवाजाने घराचे आभामंडळ प्रभावित होते. यामुळे घरातील सर्व नळ व्यवस्थित बंद करून ठेवावेत आणि खराब नाळ दुरुस्त करून घ्यावेत.

2. अनेक लोकांना रात्री स्नान करण्याची सवय असते. परंतु शास्त्रामध्ये रात्री स्नान करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. म्हणजेच या वेळी स्नान करू नये.

निशायां चैव स्नाचात्सन्ध्यायां ग्रहणं विना।

अर्थात- रात्री स्नान करू नये. ज्या दिवशी ग्रहण असेल त्या दिवशीच रात्री स्नान करणे योग्य राहते. रात्रीच्या वेळी स्नान करणे पाण्याचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. जो व्यक्ती पाण्याचा अशाप्रकारे दुरुपयोग करतो, त्याच्या घरात नेहमी धनाचा अभाव राहतो.

3. आपल्या धर्म ग्रंथ आणि पुराणांमध्ये पाणी वाचवण्यासाठी  पाणी ओंजळीने पिणे निषिद्ध सांगितले आहे.

वार्यञ्जलिना पिबेत-मनुस्मृति,स्कंदपुराण

जलं पिबेन्नाञ्जलिना-याज्ञववल्क्यस्मृति ||

कारण ओंजळीने पाणी पिताना जास्त पाणी वाया जाते. या संदर्भात एक कथा प्रचलित आहे. समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मीच्या आधी त्यांची मोठी बहिण अलक्ष्मीची अर्थात दरिद्रतेची उत्पत्ती झाली होती. तिला राहण्याची जागा सांगताना लोमष ऋषींनी सांगितले की, ज्या घरामध्ये पाण्याच्या जास्त व्यय केला जातो त्याठिकाणी तू तुझा पती अधर्मसोबत सदैव निवास कर. म्हणजे ज्या घरामध्ये व्यर्थ पाणी वाया घातले जाते, त्याठिकाणी दरिद्रता आपला पती अधर्मसोबत निवास करते.

 

 

 

मागे

दुर्भाग्याचे कारण बनू शकते  बंद आणि फुटके घड्याळ
दुर्भाग्याचे कारण बनू शकते बंद आणि फुटके घड्याळ

प्रत्येक घरामध्ये भिंतीवर लावलेले घड्याळ जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते....

अधिक वाचा

पुढे  

ताटात उष्टे सोडल्याने संपते बरकत
ताटात उष्टे सोडल्याने संपते बरकत

आपण दैनंदिन जीवनात अऩेक चुका करत असतो. या चुका आपल्याला सामान्य वाटतात, परंत....

Read more