ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

किचनमध्ये केलेल्या या चुकांमुळे वाढतो वास्तुदोष

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 02:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

किचनमध्ये केलेल्या या चुकांमुळे वाढतो वास्तुदोष

शहर : मुंबई

किचन घरातील सर्वात खास जागांमधील एक जागा आहे. कारण याच जागेशी घराचा वास्तू आणि सदस्यांचे आरोग्य निगडीत आहे. किचन संदर्भात विविध गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरातील सर्व अशुभ प्रभाव नष्ट केले जाऊ शकतात.

1. किचनमध्ये देवघर बनवणे शुभ मानले जात नाही. ज्या घरातील किचनमध्ये देवघर असते, तेथे राहणारे तापट, गरम डोक्याचे होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याला रक्ताशी संबंधित आजाराला सामोरे जावे लागू शकते.

2. ज्या घरात किचनमध्ये स्टोअर रूम असेल तेथील गृहस्वामीला नोकरी किंवा व्यापारात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या त्रासापासून दूर राहण्यासाठी किचन आणि स्टोअर रूम वेगवेगळे बांधावे.

3. किचन आणि बाथरूम एकाच रेषेत जवळजवळ असणे शुभ मानले जात नाही. अशा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना आयुष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही ठीक राहत नाही. अशा घरातील मुलींच्याआयुष्यात अशांती राहते.

4. घराच्या मेनगेटच्या ठीक समोर किचन असू नये. मेनगेटच्या ठीक समोर असलेले किचन घरातील सदस्यांसाठी अशुभ राहते.

5. किचन पाण्याची टाकी किंवा विहीर, आडाला चिटकून असेल तर भावांमध्ये मतभेद राहतात. घरातील मुख्य व्यक्तीला पैसे कमावण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

6. ज्या घरात किचन मेनगेटला जोडून असते, तेथेप ती-पत्नीमध्ये विनाकारण वाद निर्माण होतात.

 7. स्नान करता किचनमध्ये प्रवेश करणे वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले जाते. असे केल्याने किचनमध्ये नकारात्मक उर्जा येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये चिडचिड आणि आळस वाढतो.

 

 

 

मागे

घरात निगेटिव्हिटी  पसरवणारे मुख्य कारण
घरात निगेटिव्हिटी पसरवणारे मुख्य कारण

घरामध्ये वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. घर अस्वच्छ असल्यास निगेटिव्हि....

अधिक वाचा

पुढे  

वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा
वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा

ज्‍योतिष शास्‍त्रानुसार आपल्‍या आजुबाजुच्‍या वातावरणात अनेक उर्जा का....

Read more