ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

घरात निगेटिव्हिटी पसरवणारे मुख्य कारण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घरात निगेटिव्हिटी  पसरवणारे मुख्य कारण

शहर : मुंबई

घरामध्ये वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. घर अस्वच्छ असल्यास निगेटिव्हिटी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्यास तेथे धन आणि सुख-समृद्धी टिकत नाही. कोळ्याचे जाळंही वास्तूमध्ये निगेटिव्हिटी पसरवणारे मुख्य कारण मानले जाते. येथे जाणून घ्या, या संदर्भातील इतर काही खास गोष्टी....

घरातील वडीलधारी मंडळी सतत सांगत असतात की, घरामध्ये कोळ्याच जाळ नसावं. हा अंधविश्वास नसून यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. कोळ्याच्या जाळ्यांची संरचना काहीशी अशी असते की, त्यामध्ये नकारात्मक उर्जा एकत्रित होते.

यामुळे घराच्या कोपर्यांमध्ये कोळ्याची जाळे-जळमट असतात. घरातील अशा भागामध्ये नकारात्मक उर्जा असते. या कारणामुळे घरात कलह, आजार आणि इतर अडचणी निर्माण होतात.

 तसेच कोळ्याच्या जाळ्यांमध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक असतात. यामुळे म्हटले जाते की, घरात धूळ, जाळी जळमट असल्यास सुख-समृद्धीचा नाश होतो.

 

मागे

मूलांक 4
मूलांक 4

4 हा अंक अतिविचारशील व रचनात्मक मूलांक आहे. या अंकाचा स्वामी हर्षल असून, याला ....

अधिक वाचा

पुढे  

किचनमध्ये केलेल्या या चुकांमुळे वाढतो वास्तुदोष
किचनमध्ये केलेल्या या चुकांमुळे वाढतो वास्तुदोष

किचन घरातील सर्वात खास जागांमधील एक जागा आहे. कारण याच जागेशी घराचा वास्तू आ....

Read more