ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Vastudosh : निवारणाचे उपाय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2019 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Vastudosh :  निवारणाचे उपाय

शहर : मुंबई

घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाही. हा आपला गैर समज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात.

  • आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपर्यात ठेवावे.
  • आपल्या शयनकक्षात खरगटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते.
  •  कुटूंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे.
  • कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे.
  • घरातील पुरूष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दीवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी.
  • शयनकक्षात झाडू नये. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशी जवळ लाल चंदन ठेऊन झोपावे.
  • जर दुकानात नेहमी चोरी होत असेल तर दुकानाच्या पायरीजवळ पूजा करून मंगल यंत्राची स्थापना करावी.
  • दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्याद्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी.
  • घरातील िन्याखाली बसून महत्त्वपूर्ण कार्य करू नये.
  •  दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.
  • गुप्त शत्रु त्रास देत असतील तर चांदीचा नाग तयार करून  झोपताना त्यांना पायाशी ठेवले पाहिजे.
  •  नवीन जागी मन रमत नसेल, कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.
  •  घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद थिंपळावी ब्राम्हणास पिवळे वस्त्र दान करावे.
  • जर संतती सुख नसेल, मुलगा वडील यांच्यात जमत नसेल तर सूर्य यंत्र मुख्यप्रवेशद्वारमध्ये ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी.

मागे

मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असण्याचे महत्त्व
मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असण्याचे महत्त्व

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञा....

अधिक वाचा

पुढे  

दूर करा घरातील निगेटिव्ह अॅनर्जी फक्त एक ग्लास पाण्याने
दूर करा घरातील निगेटिव्ह अॅनर्जी फक्त एक ग्लास पाण्याने

तुमच्या घरात सारखे नकारात्मक काही घडत आहे, ज्यामुळे भांडण, नुकसान, आजारपण सत....

Read more