ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

अपघातग्रस्त एएन-३२मधील शहिदांचे मृतदेह हाती

पोस्ट :  डिसेंबर 21, 2019 05:51 PM



अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या भारतीय वायूदलाच्या एएन३२ या विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यानया विमानातील १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. भारतीय वायूदलाने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. मृतांमध्ये जी.एम. चार्ल्सएच. विनोदआर. थापाए. तन्वरएस. मोहंतीएम.के गर्गके.के. मिश्राअनुप कुमारशेरीनएस.के. सिंगपंकजपुतली आणि राजेश कुमार यांचा समावेश आहे. 

हवाई दलाचे शोध पथक गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त एएन३२च्या घटनास्थळावर पोहोचले. भारतीय लष्कराने विमानातील सर्व १३ जणांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आहे. घटनास्थळाहून सर्व १३ शहिदांचे मृतदेब सापडले असून ते विशेष हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशमध्ये आणण्यात येणार आहेत. तसेच घटनास्थळाहून दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. 

 जून रोजी आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या एएन३२चे अवशेष ११ जून रोजी अरुणाचल प्रदेशातील टेटो परिसरात सापडले होते. त्यानंतर घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र खराब हवामानामुळे तिथे पोहोचता येत नव्हते. बुधवारी १५ गिर्यारोहकांना एमआय१७आणि एडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरच्या मदतीने घटनास्थळाच्या जवळ पोहोचवण्यात यश आले. त्यानंतर शोध घेतल्यानंतर १३ जणांचे शव सापडले.या दुर्घटनेत शहीद झालेल्यांमध्ये हवाई दलाचे सहा अधिकारी आणि सात एअरमन आहेत. या दुर्घटनेत विंग कमांडर जीएम चार्ल्सस्काडर्न लिडर एच विनोदफ्लाईट लेफ्टनंट आर थापाफ्लाईट लेफ्टनंट  तन्वरफ्लाईट लेफ्टनंट एस मोहंतीफ्लाईट लेफ्टनंट एमके गर्गवॉरंट ऑफिसर केके मिश्राअनूप कुमारशेरिनलीड एअरक्राफ्ट मॅन एसके सिंहलीड एअरक्राफ्ट मॅन पंकजपुताली आणि राजेश कुमार हे शहीद झाले.