ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - चक्रवर्ती राजगोपालाचार्य

पोस्ट :  डिसेंबर 21, 2019 06:17 PM



भारतरत्नहा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५४ पासून हा पुरस्कार देशासाठी  योगासन देणार्याा महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे भारतरत्नपुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणार्या् विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. पहिल्या लेखात १९५४ मध्ये प्रथमच ज्यांना हा भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांची थोडक्यात माहिती देत आहोत!

           चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांचा जन्म दि. 10 डिसेंबर 1878 रोजी तमिळनाडू प्रांतातल्या सेलम जिल्ह्यातील होसूर उपनगरतील 7-8 कि.मी दूर असलेल्या तोरापल्ली नावाच्या एका लहानशा गावात, एका वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्री. नल्लन चक्रवर्ती होसून येथे मुन्सफाचे काम करत असत. राजाजींचे प्राथमिक शिक्षण होसूरमध्ये झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली.   

       बेंगलुरच्या सेंट्रल हिंदू कॉलेजमधून इंटरमिजिएट होऊन मद्रासच्या प्रेसिडेंसी कॉलेजमधून बी. ए. व एल. एल. बी. केले आणि सेलम जिल्हा कोर्टात वकिलीची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. व्यवसायातील पदार्पणातील त्यांनी पहिला नियम सोडला, तो म्हणजे सिनिअर वकिलांच्या हाताखाली प्रॅक्टिस सुरू न करता सरळ स्वत:चे काम सुरू केले आहे.

      त्यांनी समाजात पूर्वापार चालत आलेले धार्मिक अवडंबर, स्पृश्यास्पृश्यता, शिवाशीव, पाखंडीपणा या विरोधात ते कंबर कसून उभे राहिले. कारण त्यांच्या बालवयापासून ते हे सगळं बघत होते. ते त्यांना असह्य झाले होते. समाजातील वरिष्ठ जातीवर्ण यामुळे चकित झाला. दुखवला. त्यांना समजावले गेले की, त्यांना हे सगळे सोडून द्यावे; पण त्यांनी कोणानेच काहीही एकले नाही. यामुळे चिडून जाऊन त्यांनाच जातीबहिष्कृत केले गेले. इतके की, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर दहन संस्कारालाही कोणी आले नाही. तरीही ते आपल्या निर्णयावर निश्चल राहिले.  

        त्यांच्या समाजसेवेमुळे ते सेलम नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. दोन वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात अस्पृश्यांसाठी त्यांनी खूप मोलाची कामे केली आहे. त्यांना मनाई असलेल्या रस्त्यांवरून चालण्याची अनुमती, नगरपालिकेच्या नळाचे पाणी, मिळणे, देवळांच्या आजूबाजूला हिंडणे फिरणे बसणेअशा सगळ्या गोष्टींनी कायदेशीर मान्यता मिळवून दिली. साहजिक या क्रांतिकारी बादलांमुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल स्थान निर्माण झाले.

       ‘हिंदूपत्राचे संपादक स्व. कस्तुरीरंगम आयंगर यांच्या आग्रहावरून ते मद्रासला आले आणि तेथे हायकोर्टात त्यांनी वकिली सुरू केली. इ. स. १९१९ मध्ये त्यांनी गंडिजींना मद्रासला भेटीसाठी बोलावून घेतले गेले. त्यावेळी ते राजजींच्या घरीच राहिले होते. त्या दोघांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते.

        इ. स. १९२० मध्ये नागपूर अधिवेशनातील असहयोगाच्या प्रस्तावानुसार देशबंदू चित्तरंजनदास, पं. जवाहरलाल नेहरू आदी वकिलांबरोबर राजजींनीही आपली वकिली सोडून ते स्वातंत्र्याच्या लढाईत उतरले. १९२१ मध्ये राजाजी कॉंग्रेसचे महामंत्री बनले. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी म. गांधींनी साबरमती आश्रमात २० दिवसांनी दांडी यात्रा केली; त्याच वेळी इकडे तिरूचिल्लापल्लीहून १५ दिवस पायी चालून राजजींनी वेदारण्यमच्या सागरकिनारी मिठाचा कायदा तोडून अटक करवून घेतली.

      दक्षिणेकडील अहिंदी भाषी प्रदेशात हिन्दी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेची स्थापना केली. तिचे कार्यालय त्यांनी स्वता: च्या घरातच उघडले.

      इ. स. १९४६ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली बनविल्या गेलेल्या अंतरीम सरकारात राजजींनी उद्योग आणि वाणिज्य मंत्री बनविले गेले. त्यानंतर शिक्षण आणि अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे सोपविले. भारताचे मावळते गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटननी त्यांची स्तुती केली; जेव्हा त्यांच्या नंतर भारताचे गव्हर्नर जनरल पद राजजींना दिले. त्यांनी सांगितले की, “माझे उत्तराधिकार नवे गव्हर्नर जनरल हे महान राजनीतीतज्ञ आणि आकर्षक, रुबाबदार व्यक्तिमत्वाचे आहेत.

       राजजींनी त्या काळातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे म्हणजेच गांधीवादी राजनीतिक क्षेत्राचे चाणक्य मानले जात होते. दोन वर्षानी त्यांनी भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचा राजीनामा दिला होता तरीही त्यांची, त्यांच्या कार्याची, नवभारतासाठी असलेली आवश्यकता जाणून सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर पं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना डिसेंबर १९५० मध्ये भारताचे गृह मंत्रालय दिले. राजाजी कट्टर गांधीवादी, कॉंग्रेसी होते; मात्र त्यांचे कार्य नेहमीच त्यांच्या स्वता: च्या स्वतंत्र आणि तर्कसंगत विचारधारेनुसार असायचे. म्हणूनच त्यांनी कोणत्याही मोठ्यात मोठ्या मानसशीसुद्धा कधीही समझोता केला नाही. हातमिळवणी केली नाही. याच त्यांच्या हट्टी स्वभावामुळे पं. जवाहरलाल नेहरूंशी त्यांचा मतभेद झाला आणि त्यांनी सन १९५१ मध्ये गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला; पण त्यानंतर तमिळनाडू प्रांताचे मुख्यमंत्री झाले, कारण तेथील परिस्थिती फारच अशांत आणि अस्थिर होती. या काळात त्यांनी तेथे अनेक अत्यावश्यक कामे केली. शाळांमध्ये हिंदी विषय सक्तीचा केला; मात्र जेव्हा  एकूण समाजस्थितीची सुधारणा होत गेली आणि जनतेने विरोध कारला सुरुवात केली, तेव्हा स्वता: हून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजजींनी राजीनामा दिला.

        राजजींनी निषेध, काळे झेंडे यांची कधीच पर्वा केली नाही; जे त्यांच्या जीवनात अनेक वेळा घडत गेले होते. कारण भावनांपेक्षा स्वता: घेतलेल्या तत्वनिष्ठ तार्तिक निर्णयावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच कोंग्रेसच्या स्वतंतत्र्य आंदोलनात ते पाच वेळा तुरुंगात गेले; पण जेव्हा त्यांना कळले की, कॉंग्रेस योग्य प्रकारे काम करत नाही, तेव्हा कॉँग्रेसच्या कार्यक्रमांपासून ते पूर्णतया: विभक्त झाले; पण नंतर इ. स. १९४५ मध्ये पुन्हा कोंग्रेसमध्ये दाखल होऊन स्वातंत्र्यासंबंधी चर्चेत अत्यंत व्यासंगपूर्ण सहभाग घेतला.

        दि. १८ मार्च १९१९ ल देशात रौलेट अॅक्टचे दमन चक्र फिरू लागले. तेव्हा संपूर्ण देशात गांधीजींच्या हाकेनुसार हरताळ सुरू झाला. राजजीही सत्याग्रहात सामील झाले. त्यांना अटक झाली. त्यांनी स्वत: ला त्यात झोकून दिले.

           गांधीजींच्या तुरुंगवारीच्या वेळी यंग इंडियानामक पत्राचे प्रकाशन राजजीच करत होते. गांधी- आंबेडकर वादामध्ये राजजींनीच समझोता घडवून आणला.

            गांधीजींचा मुलगा देवदासआणि राजजींची मुलगी लक्ष्मी१९२७ मध्ये विवाह करू इच्छित होते; पण राजाजी ब्राह्मण व गांधीजी वैश्य होते. त्या काळात या आंतरजातीय विवाहाला हिंदू समाजाची मान्यता नव्हती. मग दोघांच्या वडिलांनी मुलांना अट घातली, की पुढील पाच वर्ष दोघांनीही कुठलेही संबंध न ठेवता अलग रहावे. त्यानंतर जर दोघांनाही लग्न करायचे असेल तर करू शकतात.याप्रमाणे दोन्ही मुलांनी केल्यानंतर इ. स. 1933 मध्ये अत्यंत थाटामाटात दोघांचे लग्न झाले.

           दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी कोंग्रेस, ब्रिटिश सरकार आणि राजाजी यांच्या तणातणी झाली. वादविवाद, प्रतिवाद झाले. गांधीजी राजजींमध्ये मतभेद झाले. अनेक कोंग्रेसी नेतेही त्यांच्याशी असहमत होते. तरी राजजींनी आपले स्वत: चे मत बदलेले नाही. कारण त्यांचा स्वत: च्या बुद्धीवर व निर्णयावर पूर्ण विश्वास होता.

           राजाजी केवळ कुशल राजनीतीतज्ञ नव्हते, तर सिद्धहस्त लेखक आणि प्रभावी वक्ताही होते. त्यांच्या वाणीप्रमाणेच त्यांची लेखणीही धारधार होती. तामिळ आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर त्यांचे सारखेच प्रभुत्व होते. रामायण आणि महाभारतावर त्यांनी लिहलेली पुस्तके लोकप्रिय झाली. स्वराज्यत्यांचे आवडते साप्ताहिक पत्र होते. जनतेला दर आठवड्याला या साप्ताहिकामधून राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय विषयांवरील राजजींची मते, विचार स्पष्ट शब्दांत आणि मर्मग्राही भाषेत वाचायला मिळत असत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीही त्यांच्या व्यक्तिमत्वामधून नेहमीच प्रतीत होत असे. धोतर, सदरा, हातात घड्याळ, पायात चपला, डोळ्यांवर काळा चष्मा हाच त्यांचा कामाचा पोशाख असत. द्रुमपान आणि मध्यपानाचे कट्टर विरोधी होते. जात पात, शिवाशीव ते कधीच मानत नसत. गांधीजींचे तर ते परमभक्त होते.

       अशा या विलक्षण प्रतिभेच्या दूरदर्शी राजनीतीतज्ञाला भारत सरकारने इ. स. १९५४ मध्ये भारतरत्नकिताब देऊन गौरविले.

       दि. २५ डिसेंबर १९७२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी या महान सुधारणवादी देशभक्ताचा मृत्यू झाला.