ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    
बातम्या

शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार

पोस्ट :  डिसेंबर 21, 2019 05:24 PMकोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज  लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. उंबरवाडी गावचे रहिवासी असलेले जोतिबा चौगुले हे जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये रविवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी 'अमर रहे, अमर रहे, जोतिबा चौगुले अमर रहे', अशा घोषणा देण्यात आल्या.

         जवान जोतिबा चौगुले यांच्या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या गावातील लोकांनी चौगुले यांना आलेल्या वीरमरणाचा अभिमान व्यक्त केला. याशिवाय गावातल्या तरुणांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही केला.

       चौगुले यांना आदरांजली वाहण्यासाठी महागाव आणि उंबरवाडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. महागावाची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून चौगुलेंना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, चौगुलेंच्या अंत्ययात्रेसाठी शाळेतील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले  होते.

    शहीद जोतिबा चौगुले हे सन २००९ मध्ये लष्करात दाखल झाले होते. ते जम्मूमधील राजुरी येथील सीमेवर तैनात होते. सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.