ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    
बातम्या

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

पोस्ट :  डिसेंबर 21, 2019 06:02 PMजम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांसोबत लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांना वीरमरण आले आहेवाळुंज हे चांदवड तालुक्यातील भरवीर येथील रहिवासी होतेसोमवारी (21 ऑक्टोबरत्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं जाणार आहेमंगळवारी (22 ऑक्टोबरमूळगाव भरवीर येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेतया घटनेमुळे चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेतरविवारी (20 ऑक्टोबरदेखील जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलायामध्ये आपल्या देशाच्या दोन जवानांना वीरमरण आलंतसंच एक सामान्य नागरिकही मृत्युमुखी पडलापाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंमिळालेल्या माहितीनुसारपाकिस्तानी सैन्यानं कुपवाड्यातील तंगधार सेक्टरमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास सीमेपलीकडून घुसखोर पाठवण्याचा प्रयत्न केलायावेळेस शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केलंया गोळीबारात परिसरातील दोन घरांचं नुकसान झालंदरम्यानया हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.

दरम्यानआज सकाळी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापतींना भारताच्या लष्करानं सडेतोड उत्तर दिलं आहेप्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मदलष्कर ए तोयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या 35 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहेशनिवारी (19 ऑक्टोबररात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होतायामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होतेत्याचा बदला घेत भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलंभारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केलेया हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले आहेततसेच पाकिस्तानचे सहा सैनिक ठार झाले असून 25 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेततर 35 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहेभारताने याआधीही सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होतेत्यानंतर आता ही मोठी कारवाई केली आहे.

भारतीय जवानांनी तंगधार सेक्टरमधून तोफांना मारा केलाभारताच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक लाँच पॅड उद्ध्वस्त झाले आहेतत्याआधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून काल (शनिवारीरात्री झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले होतेपाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला भारताने देखील चोख उत्तर दिले.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेमोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने सीमेपलिकडून गोळीबार करण्याचे प्रमाण वाढवले आहेपाकिस्तानकडून शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झालेया गोळीबारात एक नागरिक देखील ठार झाला असून अन्य तिघे जण जखमी झाले.काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाहा गोळीबार दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी करण्यात आला होता.