ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - मोरारजी देसाई

पोस्ट :  जानेवारी 18, 2020 05:54 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९९० मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते मोरारजी देसाई यांची थोडक्यात माहिती.

 

          मोरारजी देसाईंचा जन्म सूरत जिल्ह्यातील भदेली या आजोळच्या गावात  दि. २९ फेब्रुवारी १८९६ रोजी झाला. सरळ, सामान्य, शिस्तप्रिय असे श्री. रणछोडजी देसाई हे मोरारजींचे वडील भावनगर स्टेटमध्ये अध्यापक होते. आईचे नाव विजयाबेन होते. मोरारजी लहानपणी अशक्त व किडकिडीत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. मॅट्रिक परीक्षा त्यांनी प्रथम श्रेणीत पास केली. त्यामुळे त्यांना १० रुपये शिष्यवृत्ती मिळाली.

 

         वयाच्या पंधराव्या वर्षी गजराबेन नावाच्या मुलीबरोबर त्यांचे लग्न ठरवले. त्या वेळी तिचे वय ११ वर्षांचे होते. नेमके त्याच वेळी घराजवळील विहिरीत पडून वडिलांचा मृत्यू झाला. पण लगेच मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी त्यांचे ठरलेले लग्न झाले. आता नऊ जणांच्या कुटुंबाचा भार त्यांच्यावरच आला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते १९१३ मध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये आले. त्या वेळी साडेचार वर्षं ते 'गोकुळदास तेजपाल फ्री बोर्डिंग हाऊस'मध्ये राहिले. विल्सन कॉलेजमधून प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी बी. एससी. पास केले. म्हणून त्यांना पन्नास रुपये महिना शिष्यवृत्ती मिळू लागली.

 

        मोरारजींची एम. एससी. करून प्रोफेसर बनण्याची इच्छा होती. इ. स.१९१७ मध्ये 'युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर्स' चालू केला गेला. यात मोरारजींनी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना कमिशंड ऑफिसरचे पद मिळाले. कॅप्टन सिसोनना त्याच काम खूप आवडले. त्यांच्याच आग्रहाने मोरारजींनी फेब्रुवारी १९१८ मा प्रॉविंसियल सिव्हिल सर्व्हिसमध्ये अर्ज केल्यावर त्यांची मुलाखत झाला आ काही दिवसांनी पी. सी तालुक्या सांनी पी. सी. एस. साठी त्यांची निवड झाल्याची तार त्यांना मिळाली. मोरारजींची नियुक्ती अहमदाबादमध्ये उप-समाहर्ता पदावर दोन वर्षांनंतर ते ठाणे जिल्ह्याचे 'प्रांत ऑफिसर' झाले. मग तीन स्यांचे प्रशासन अधिकारी म्हणून १९२३-२४ मध्ये भडोचला कार्यरत होते. समाहर्ता म्हणून त्यांची दोन प्रकारची कर्तव्ये होती. एक वित्तीय विभाग व परेसन डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. या पदावर १९२९-३० पर्यंत ते होते, तेव्हा मारे १००० 'फौजदारी' खटल्यावर त्यांनी निर्णय दिला व त्यावरील केवळ तीन पिले हायकोर्टाने स्वीकारली. या क्षेत्रात ते खूपच प्रसिद्ध झाले; पण शेवटी इंग्रजांची वागणूक बघून २१ मे १९३० ला त्यांनी राजीनामा दिला व काँग्रेसची सदस्यता स्वीकारली. स्वदेशी आंदोलनात सहभागी झाले. राजकारणात उतरले. धारासना सत्याग्रहात सामील झाले. इंग्रज सरकारने त्यांना पकडून साबरमती तुरुंगात पाठवले. त्याच दिवसांत त्यांच्या लहान मुलाचा चीनूचा मृत्यू झाला.

 

          फेब्रुवारी १९३१ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर, पुन्हा स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. साहजिकच पुन्हा साबरमतीच्या तुरुंगात टाकले व नंतर तिथून नाशिक तुरुंगात रवानगी केली. इ. स. १९३३ मध्ये त्यांची सुटका झाली. मग पुन्हा १९४२ च्या 'चले जाव' चळवळीच्या वेळी सर्वच नेत्यांबरोबर मोरारजींनाही अटक झाली. 


         या नंतरच्या भारताच्या राजकारणानुसार ३ जून १९४७ ला पाकिस्तानची निर्मिती झाली. सर्वत्र दंगे उसळले. त्या वेळी मोरारजी मुंबई सरकारचे गृहमंत्री होते. कर्तव्यामध्ये ते चोख होते. निडर होते. त्यांनी खंबीरपणे निर्णय घेऊन हिंदू- मुस्लीम जातीय दंगे रोखण्यात यश मिळवले. इ. स. १९५२ मध्ये निवडणुकीत उतरून ते विधानसभा सदस्य झाले व या वेळी मुख्यमंत्री बनले. इ. स. १९५४ मध्ये पं. नेहरूंनी त्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात बोलाविले व तेथे व्यापार तथा उद्योग मंत्रालयाचे खाते त्यांच्यावर सोपविले. त्याकाळात भारताच्या दृष्टीने त्यांना गुजरातसह मुंबई प्रांत (Bombay Province) हवा होता. पण संपूर्ण महाराष्ट्राने अत्यंत कडवा, प्राणान्तिक विरोध केल्यामुळे, नाइलाजाने त्यांना माघार घ्यावी लागली. 

 

         इ. स. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या; त्या वेळी मोरारजी देसाई उप-पंतप्रधान होते. १६ जुलै १९६९ रोजी जेव्हा ते अर्थमंत्री होते तेव्हा इंदिराजींच्या सांगण्यावरून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. लावधी त्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक बदल घडत गेले. इंदिरा गांधींचा राजीनामा मार गेला. तेव्हा २५ जून १९७५ च्या मध्यरात्री २ वाजता इंदिराजींनी 'आणीबापी घोषणा केली व जयप्रकाश नारायण आणि मोरारजींना पकडून अज्ञात सय ठेवले. एक लाखाहून अधिक लोकांना कैद केले. 'आणीबाणी काला म्हणून वर्तमानपत्रांवर व अनेक संस्थांवर निर्बंध घातले.

 

          यामुळे २३ जानेवारी १९७७ ला चार विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 'ज. पक्षा'ची स्थापना केली. त्यामुळे २४ मार्च १९७७ ला ‘जनता पक्षा'चे सरका बनले. सर्वप्रथम या सरकारने 'आणीबाणी' म्हणून लादलेले सर्व निर्बंध र केले. २४ मार्च, १९७७ ते १९ जुलै १९७९ या ‘जनता सरकार'च्या काळात मोरारजी देसाई पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी देशहिताची महत्त्वाची कामे केली महिलांना योग्य सन्मान मिळावा असे त्यांना नेहमीच वाटे. मोरारजी स्वत: अत्यंत संयमित जीवन जगणारे होते. ९९ वर्षांचे आयुष्य यामुळेच त्यांना लाभले. सूर्योदयापूर्वी उठणे, योगासने, ईश्वरचिंतन, सूत-कताई हे त्यांचे रोजचेच नियम होते. ते पूर्ण शाकाहारी व मिताहारी होते. एक वेळच जेवत असत. जेवणात दूध, खजूर, फळे, साधे फुलके व हिरव्या भाज्या खात असत. इ. स. १९२१ पासून त्यांनी चहा-कॉफी पूर्ण बंद केली होती. आयुर्वेदावर त्यांचा विश्वास होता. इंजेक्शन घ्यायलाही त्यांची मनाई होती. 

 

        २९ फेब्रुवारी हा जन्मदिनांक असल्यामुळे वाढदिवस चार वर्षांनी एकदा येत असे. त्यांची दिनचर्या व सात्त्विक वृत्तीमुळे ते नक्की शंभर वर्षे जगतील असेच सर्वांना वाटले होते. पण तत्पूर्वी १० एप्रिल १९९५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ते गुजरात विद्यापीठाचे संस्थापक होते. शेवटपर्यंत तिथे कार्यरत होते. त्यांच्या इच्छेनुसार गुजरात विद्यापीठाच्या जवळच त्यांचा अंतिम संस्कार केला गेला. अशा या निष्ठावान गांधीवादी नेता मोरारजी देसाईंचा सन्मान भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९१ रोजी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन केला.