ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Budget 2021: तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 07:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Budget 2021: तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

शहर : मुंबई

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना आज बजेट २०२१ सादर केलं. जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवण्याकरता 'स्क्रॅप पॉलिसी'ची घोषणा केली आहे. 'क्लीन एअर' चा विचार करता या पॉलिसी अंतर्गत २० वर्षांपूर्वीच्या खासगी गाड्या आणि १५ वर्षांपूर्वीच्या व्यावसायिक गाड्यांना ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरमध्ये जावं लागणार आहे.

जुन्या गाड्या भंगारात जाणार

नुकतंच रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सरकारी वाहनांकरता १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅपमध्ये पाठवण्यास मंजुरी दिली आहे. मंत्रालयाच्या या निर्णयानुसार केंद्र, राज्य सरकार आणि पब्लिक सेक्टरच्या कंपन्यांनी वापरलेल्या १५ वर्षांच्या जुन्या गाड्या हटवाव्या लागतील. या पॉलिसीचं पालन एप्रिल २०२२पासून होणार आहे.

२०१६ पासून पाहत होते वाट

केंद्र सरकारने मे २०१६ मध्ये जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवण्यासाठी Voluntary Vehicle Fleet Modernisation Programme चा वापर केला होता. सरकारला असं वाटत आहे की, या पॉलिसीमुळे रस्त्यावर असलेल्या १५ वर्षे जुन्या २.८ करोड गाड्या हटवण्यास मदत होईल.

प्रदूषणापासून सुटका

आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासानुसार, एकूण वायू प्रदूषणा पैकी ७०टक्के वायू प्रदूषण हे केवळ वाहनांमुळे होत असते. अशातच जुनी वाहनं हटवल्यामुळे वायू प्रदूषण कमी होईल. 

मागे

Budget 2021 : होम लोन धारकांना काय मिळालं बजेटमधून?
Budget 2021 : होम लोन धारकांना काय मिळालं बजेटमधून?

केंद्रीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ चं बजेट सादर....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रातल्या २ शहरांमधल्या मेट्रोसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा
महाराष्ट्रातल्या २ शहरांमधल्या मेट्रोसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा

महाराष्ट्रातल्या दोन शहरांमधल्या मेट्रोबद्दल मोठी घोषणा अर्थमंत्र्यांन....

Read more