By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 06:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
स्टॉकहोम - भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळवारी स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा मोठा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अभिजीत भारतीय पारंपरिक वेशभूषेत दिसले. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
नोबेल पुरस्कार स्विकारताना अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी यांच्या भारतीय पेहरावात दिसून आले. गेली कित्येक वर्ष परदेशात स्थायिक होऊनही भारताशी आपल नाते घट्ट ठेवण्याचे, जमिनीवर राहण्याचे संस्कार यानिमित्ताने लाखो भारतीयांना पाहायला मिळाले. वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारस्वीडनचे राजा कार्ल गुस्ताफ यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला.
अभिजीत बॅनर्जी हे सध्या मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आणि त्यांची पत्नी डफलो 'अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अॅक्शन लॅब' चे को-फाउंडर आहेत. बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९८३ मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. त्याचा तब्बल ५० लाख मुलांना फायदा झाला आहे
अर्थव्यवस्था मंदी अशीच कायम राहिली तर भारतात आयटी कंपन्या ३० ते ४० हजार कर्....
अधिक वाचा