By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chandigarh
चंदीगढ : भारत-पाक सीमेवरुन ड्रोनच्या सहाय्याने शस्त्रांची आणि अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा प्रकार माध्यमातून समोर आला आहे. या प्रकरणात पंजाब पोलिसांनी एका जवानासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्करात हुद्यावर असलेल्या जवानाचे नाव राहुल चौहान आहे. तर त्याचे साथीदार धर्मेंद्र सिंग आणि बालकर सिंग अशी या दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा भारत - पाकच्या सीमेवरून जी.पी.एसच्या आधारे ड्रोनद्वारे पिस्तुलाची तस्करी करत होता. या देवाण-घेवाण च्या तस्करीत तो प्रशिक्षण ही देत होता. पंजाब पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्वरित त्यांच्यावर कारवाई केली.
आरोपींकडून चिनीमातीपासून बनविण्यात आलेले दोन ड्रोन, १२ ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, इन्सास रायफल काडतूसे, वॉकी-टॉकी आणि ६ लाख २२ हजार रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
जिद्द, चिकाटी आणि प्रचंड महत्वकांक्षेच्या जोरावर आपल्या देशा....
अधिक वाचा