ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

"मॅनेजमेंट” पैशांचे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2019 04:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

भारतीय महिला पैशाचे व्यवस्थापन म्हणजेच "मनी मॅनेजमेंट" मध्ये तरबेज आहे. भारतातील खूपशा महिला अशा आहेत की त्या नोकरी करता आपलं घर अगदी व्यवस्थित सांभाळतात. शहर असो वा ग्रामीण विभाग, तिथे वावरणारी प्रत्येक महिला आपला घरेलू व्यवहार पिढ्यान-पिढ्या चालवत आहेत. घरगुती खर्चासाठी तिला देण्यात आलेल्या पैशातून हुशारीने काही पैसे वाचवत असते; हे ज्ञान भारतीय महिलेला उपजातच असते. पण याच मॅनेजमेंटमध्ये कधीकधी चुकाही घडतात . या चुका कशा आणि यातून आपण कसे सावरू शकतो हे जाणून घेऊया

पैशाची जबाबदारी पूर्णपणे पुरुषांवर सोपवणे - :

भारतात 10 ते 15 टक्के महिला या कामासाठी बाहेर पडतात, याचाच अर्थ गृहिणींची संख्या नक्कीच या तुलनेत जास्त आहे. अशा परिस्थितीत गृहिणी असल्याने "मनी मॅनेजमेंट" हे सहाजिकच "पुरुषाकडे" जातं, पण जर घर चालवायचे असेल तर पैशाची जबाबदारी ही दोघांकडे समान पात्रतेत असावी अशी मानसिकता आता वाढत चालली आहे. तेव्हा दोघांनीही नियोजन केल्यास त्या पैशातून आपण "बचत"देखील करू शकतो.

अंकगणित समजून घेणे -:

कित्येकदा अंकगणिताचे सम्यक ज्ञान नसलेल्या महिलांना पैशाच्या बाबतीत फसवले जाते, मग त्यांना गणित येत नाही हे समजताच बाजारातील भाजीवाला असो किंवा अगदी साध्या गोष्टीत त्यांची फसवणूक केली जाते. याच फसवणुकीतून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याला अंकगणिताचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे. साधी बेरीज आणि वजाबाकी जरी आपल्याला ज्ञात असली तरी ते बचतीसाठी फायदेशीर ठरते.

वेगवेगळ्या डील्सना बळी पडणे -:

ही गोष्ट महिलांच्या बाबतीत हमखास घडते. घरात उपयुक्त नसलेली गोष्ट फक्त "डिस्काउंट" किंवा "ऑफर"च्या मोहापायी खरेदी केली जाते. अमुक वस्तू स्वस्तात मिळाली हे ठामपणे सांगताना महिला दिसतात. पण या नको असलेल्या गोष्टी खरेदी करून आपण ठरवलेल्या महिन्याच्या "बजेट"ला मात्र धक्का बसतो. बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्वाचे आहे. तरच आपण "मनी मॅनेजमेंट" करण्यात यशस्वी ठरू.

वित्तीय आयोजन करणे टाळणे किंवा पुढे ढकलणे -:

घरखर्चासाठी आपण महिन्यांमध्ये किती पैसे खर्च करावे, त्यातून आपण किती पैशांची बचत करावी याचे मॅनेजमेंट प्रत्येक गृहिणीनेच करावे. मात्र बऱ्याचदा काही गृहिणी कोणत्या कोणत्या कारणामुळे या पैशाचे मॅनेजमेंट करण्यात अयशस्वी होतात. आपण जर संपूर्ण वेळ घर सांभाळत असाल तर घरात येणाऱ्या अकाली संकट जसे कि घरात कोणी अचानक आजारी पडले अथवा आपल्या घराच्या कामासाठी पैशाची गरज लागली तर ऐन वेळी आपल्याकडे पैसे असायला हवे यासाठी गृहिणीने पैशाचे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ ज्याप्रकारे आपण बिलांचे पैसे, कामवालीचे पैसे अशे बाजूला काढतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला हातचे पैसे राहण्यासाठी देखील काही रक्कम बाजूला ठेवल्यास गरजेच्या वेळेस ती उपयोगी पडते.

वित्तीय व्यवस्थापनाबद्दल समजून घेणे -:

भारतीय लोकांना वित्तीय व्यवस्थापनाचे ज्ञान आपल्या घरातूनच मिळत आलेले आहे. आजचे युग हे डिजिटल झाले असल्याकारणाने तरुणवर्ग आपले फायनान्शियल प्लॅनिंग डिजिटली करताना दिसतात. गृहिणींनासुद्धा हे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. वित्तीय नियोजन कसे करावे याबाबत सांगणारे किंवा सोशल मिडियावर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. तसेच याची माहिती देणारे टेलिव्हिजन शोदेखील सहसा दुपारी टेलिकास्ट देतात. "सास-बहू"च्या सिरियल्स ऐवजी अशा प्रकारचे शो पाहिल्यास आपल्याच याचा फायदा नक्कीत होईल.

बऱ्याचदा आपल्याला संपूर्ण माहिती आसल्याच्या भ्रमात महिला असतात. मात्र प्रत्यक्षात करायची वेळ आल्यावर त्यांना त्याचे गांभीर्य कळते. परंतु हि गोष्ट आपण सकारात्मक दृष्टीने घ्यावी. एखाद्या गोष्टीबद्दल माहित नसणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, याचा स्वीकार करावा आणि तेवढ्याच सकारात्मक दृष्टिकोनातून त्या गोष्टीची माहिती घ्यावी त्यानुसार नियोजन करावे.

"बचत" च्या ऐवजी "खर्चाची" यादी बनवणे -:

बहुतेकदा महिला त्यांच्या यादी बनवण्याच्या "टेक्निक" मुळे फसतात. नेहमीच आपण महिन्याभरात किती खर्च केला याचीच यादी बनवली जाते. पण असे करता आपण महिन्याभरात किती खर्च आहे त्याप्रमाणे आखणी करून त्यातून आपण किती बचत करू शकतो याची यादी बनवली पाहिजे. तरच आपले "मनी मॅनेजमेंट" पक्के होऊ शकते.

भविष्याची चिंता करता पैसे खर्च करणे -:

भारतात आज महिलावर्ग नोकरी करताना दिसत आहे. डिजिटलच्या युगात राहणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स आणि बाकी उपकरणे वापरण्यात रस आहे, भविष्यात त्या उपकरणाचा वापर भलेही आपण करणार नसू पण आपल्याला अमुक वस्तू आवडली तर त्यासाठी ते उपकरण खरेदी केले जाते. महिलांना याच गोष्टीचे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. स्वत:साठीच नव्हे तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

फायनान्शियली स्वतंत्र असणे -:

काम करणाऱ्या महिला आपल्या कामाचे पैसे हे स्वतःपुरते खर्च करता आपल्या घरात राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांसाठीही किंवा गरजेच्या वस्तूंसाठी वापरला जावा. जरी आपण फायनान्शियली स्वतंत्र असलेली महिला असे म्हणत असू तरीही घरातील पुरुषांप्रमाणेच महिलेनीही अशी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी.

आपल्याला वित्तीय नियोजनाची गरज आहे हे समजून घेणे -:

कित्येकदा असं होतं की शिकलेली महिलासुद्धा तिच्या नियोजनात गफलत करते. आपल्याला काही वित्तीय नियोजनाची गरज नाही, महिन्याला आपलं सर्व छान सुरू आहे असं महिलांना वाटत असतं, पण घर आणि बाकी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वित्तीय नियोजन केल्यास त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो ही दूरदृष्टी लक्षात घेतली पाहिजे.

आजच्या धावपळीच्या आणि महागाईच्या जीवनात पैशाचा योग्य तो वापर करणे गरजेचे आहे. पुरुषप्रधान संस्कृती जरी असली तरी घराचा संपूर्ण भार हा आजही एक स्त्रीच उचलते. एकविसाव्या शतकातील महिला "चूल आणि मुल" या संकल्पनेबाहेर गेलेल्या दिसत आहेत आणि खास त्या महिलांसाठी पैशांचे "मॅनेजमेंट" करणे हे खूप महत्वाचे आहे.

मागे

सैन्यातील 100 महिला जवान पदासाठी 2 लाख महिलांचे अर्ज
सैन्यातील 100 महिला जवान पदासाठी 2 लाख महिलांचे अर्ज

25 एप्रिल पासून मिलिटरी पोलिस कोर मध्ये महिलांच्या 100 पदासाठी भरती सुरू करण्य....

अधिक वाचा

पुढे  

शिष्टाचार
शिष्टाचार

तुम्ही वरच्या फसव्या रंगावरून फार काळ जगाला फसवू शकत नाही. जगाला तुमच्या प्....

Read more