By
Sudhir Shinde | प्रकाशित:
जुलै 08, 2019 05:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यसेवा ( पूर्व) परीक्षेतील पेपर क्रमाक 2 हा अहर्ताकारी ( कौलिफाइंग ) स्वरूपाचा न ठेवता प्रचलित पद्धती प्रमाणे पूर्व परीक्षेतसाठी उमेदवाराची गुणवत्ता ( मेरीट) ठरवण्यासाठी ठेवण्यात यावा, अशी शिफारस लोकसेवा आयोगाने नेमलेल्या तज्ञ समितीने केली होती. ही शिफारस स्वीकारण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्या राज्यसेवा ( पूर्व) परीक्षेच्या प्रश्न पत्रिका क्रमाक 2 ( सामान्य अध्ययन ) संदर्भात काही उमेदवारांच्या मागणीविषयी अभ्यास करण्याकरिता आयोगाने तज्ञ समिति नियुक्त केली होती. सदर तज्ञ समितीने सर्व बाजूचा अभ्यास करून आयोगास शिफारस केली होती.