ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

बीडमध्ये दहा एकर ऊस आगीमध्ये भस्मसात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 05:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बीडमध्ये दहा एकर ऊस आगीमध्ये भस्मसात

शहर : बीड

दहा एकर ऊस आग लागल्याने भस्मसात झाल्याची घटना बीड जवळील घोसापुरी शिवारात घडली. उभा ऊस जळून खाक झाल्याने दोन शेतकर्‍यावर मोठे संकट कोसळले आहे.
बीड जवळ असलेल्या घोसापुरी शिवारात बन्सी वैद्य यांचा चार एकर आणि त्यांचे भाऊ महादेव वैद्य यांचा सहा एकर ऊस गाळप हंगामात कारखान्याकडे न देता जनावरांना चारा आणि रसवंतीसाठी राखून ठेवला होता. हाच ऊस जनावरांना चारा म्हणून वापरला जात होता, मात्र गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये शेजारी असलेला दहा एकर उभा ऊस जळून खाक झाला. ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी शेतकरी सैरभैर झाले होते, मात्र आग विझवण्यासाठी पाणी नव्हते. संपूर्ण ऊस जळून खाक झाल्यानंतरच आग आटोक्यात आली. या दुर्घटनेने वैद्य कुटूंब संकटात सापडले आहे. महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घोसापुरी येथील तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

मागे

शीघ्र कृती दलाच्या 15 शहिद जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
शीघ्र कृती दलाच्या 15 शहिद जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्....

अधिक वाचा

पुढे  

चिटफंड घोटाळा प्रकरणीः राजीव कुमार यांच्या कस्टडीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला
चिटफंड घोटाळा प्रकरणीः राजीव कुमार यांच्या कस्टडीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसा....

Read more