ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गनीचा नागपूर सेंट्रल जेलमध्ये मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गनीचा नागपूर सेंट्रल जेलमध्ये मृत्यू

शहर : नागपूर

1993 च्या मुंबई सिरीअल बॉम्ब ब्लास्टच्या आरोपी अब्दुल गनीचा नागपूर सेंट्रल जेल मध्ये मृत्यू झाला आहे. तो नागपूर जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याला काही दिवसांपूर्वी जी.एम.सी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये सेंचुरी बाजार याठिकाणी आरडीएक्स प्लांट केल्याचा त्याच्यावर आरोप होता. मुंबईतील या साखळी बॉम्ब ब्लास्टमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 लोक गंभीर जखमी होते. याप्रकरणी अब्दुल गनीला अटक करण्यात आले होते आणि तो सध्या नागपूर कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता.1993 मधील मुंबई साखळी बॉम्ब ब्लास्टने संपूर्ण देशाला हादरवले होते. या पूर्ण प्रकरणात दाऊद इब्राहिम, याकूब मेमन त्याचबरोबर त्याचा भाऊ टाइगर मेमन हे मुख्य आरोपी आहेत. यातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आणि टाइगर मेमन हे देश सोडून फरार आहेत.

मागे

अशाप्रकारे मालमत्ता जप्त करणे माझ्यासाठी आर्थिक मृत्यूदंड - विजय मल्ल्या
अशाप्रकारे मालमत्ता जप्त करणे माझ्यासाठी आर्थिक मृत्यूदंड - विजय मल्ल्या

भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला....

अधिक वाचा

पुढे  

कर्जबुडव्यांच्या मालमत्तेच्या जप्तीसाठी तातडीने मिळणार बंदोबस्त
कर्जबुडव्यांच्या मालमत्तेच्या जप्तीसाठी तातडीने मिळणार बंदोबस्त

विविध बॅँका, फायनान्स कंपन्यांचे हजारो, लाखोंचे कर्ज बुडविलेल्या थकबाकीदा....

Read more