ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मंगरुळपीर तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंगरुळपीर तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

शहर : वाशिम

मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथे 25 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पल्लवी आशिष महल्ले असे मृत महिलेचे नाव आहे. 2 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास पल्लवीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पल्लवीचे 5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तिला 4 वर्षांचा एक मुलगा आहे. अशात तिला दुर्धर आजार जडला होता. या आजाराला कंटाळून पल्लवीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी मंगरुळपीर पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पल्लवीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. पल्लवीच्या आजारावर कुटुंबीयांनी लाखो खर्च केले, परंतु ती बरी झाली नाही. त्यात घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. कुटुंब खर्च करुन हतबल झालं होतं. याबाबत पल्लवीला जाणीव होती. त्यामुळे, तिने टोकाचे पाऊल उचलल्याची गावकर्‍यांमध्ये चर्चा आहे. पल्लवीच्या पश्चात पती, सासू, सासरे आणि एक मुलगा आहे.

मागे

बुरहान वाणीच्या गँगमधील लतिफ टायगरचा खात्मा
बुरहान वाणीच्या गँगमधील लतिफ टायगरचा खात्मा

काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये चकमक सुरू आहे. यावेळी लष्करानं 2 ते 3 दहशतव....

अधिक वाचा

पुढे  

उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

उल्हासनगर येथे दोन पोलिसांच्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्य....

Read more