ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2020 08:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

शहर : लातूर

लातूरमध्ये महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अपमान सहन न झाल्याने पीडित महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (a 60 year old woman raped in latur victim commits suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, लातुर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील ही घटना आहे. किशन उगाडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेऊन वाकी नदीच्या जवळच्या शेतामध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले.

या घटनेनंतर पीडित महिलेच्या सुनेनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पण या सगळ्यात आपला अपमान झाल्या या भावनेनं पीडितेने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पीडितेने तलावात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं. खरंतर, वयाच्या 60 व्या वर्षी अशा वेदना सोसाव्या लागल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आरोपीची चौकशी करत असून नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

मागे

TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक
TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक

फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदान....

अधिक वाचा

पुढे  

नालासोपारा पोलीस हवालदार आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षकाची बदली
नालासोपारा पोलीस हवालदार आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षकाची बदली

तुळिंज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांच्या आत्महत्येप्रकरण....

Read more