ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकिस्तानात मदरशात बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू तर ७० जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2020 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकिस्तानात मदरशात बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू तर ७० जखमी

शहर : विदेश

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील मदरशात हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. तर ७० जण  जखमी झाले असून यात मुलांचा जास्त समावेश आहे.

'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. जखमींना लेडी रिडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने बॅग घेऊन मदरशामध्ये प्रवेश केला. नंतर बॅगेत ठेवलेला बॉम्ब फुटला. दरम्यान, मदत आणि बचाव दल घटनास्थळी पोहोचले आहे.

रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी सांगितले की, आतापर्यंत सात मृतदेह रुग्णालयात आणले गेले आहेत. ७० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

मागे

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक
मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

मुंबईच्या (Mumbai) गोरेगावमध्ये (Goregaon) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापाराचं....

अधिक वाचा

पुढे  

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा

नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवा....

Read more