ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदम सह इतर १५ टोळ्यांतील गुंड जिल्ह्यातून हद्दप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 02:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदम सह इतर १५ टोळ्यांतील गुंड जिल्ह्यातून हद्दप

शहर : अहमदनगर

महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांचा अपमान करणाऱ्या अहमदनगर येथील नगरसेवक श्रीपाद श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. छिंदम याने शिवाजी महाराज यांच्या बद्दल असभ्य भाषेत अपमान केला होता. या संभाषणाची ऑडियो टेप व्हायरल झाली होती त्यामुळे नागरिक संतापले होते. याबद्दल त्याला तुरुंगात टाकले होते.शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतर श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. श्रीपाद छिंदमला यापूर्वी नगर महापालिका निवडणुकीच्या वेळीही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. जिल्ह्याबाहेर राहूनही श्रीपाद छिंदम जिंकून आला होता. महापालिका सभागृहातही श्रीपाद छिंदमला मारहाण करण्यात आली होती. सोबतच नगर येथील १५ गुंडांच्या टोळ्यांतील गुंडांना जिल्ह्यातून पोलिसांनी हद्दपार केले आहे.

पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा उजगरे, सचिन नंदकुमार पळशीकर, परेश चंद्रकांत खराडे, गणेश महादेव पोटे, बिरजू राजू जाधव, समीर ख्वाजा शेख, टिंग्या किशोर साळवे, विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, गणेश अरुण घोरपडे, आकाश सुरेश पठारे, गणेश सुरेश पठारे,सागर सुरेश पठारे, सरदार मोहम्मद पठाण, अंकुश नामदेव भोरे, गौस आयाज शेख, आली आयाज शेख, मतीन आयाज शेख, बाळू अलीचंद संकलेचा, नदीम नजीर शेख, गिरीश उर्फ भैय्या तवले,सुबोध संजय फुंदे, हबीब रजाक शेख, पवन रमेश भिंगारे, जावेद अल्ताफ शेख, रमेश राजन्ना भिंगारे, समीर हसन कुरेशी, परवेज हाजी कुरेशी, वसीम अब्दुल कुरेशी, असद रौफ कुरेशी,नाविद कुरेशी, भूषण महेंद्र मोरे, योगेश राजेश निकम, सुरज प्रकाश ठाकूर, भागवत दादासाहेब लांडगे, सागर निवृत्ती लुटे, यांना वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.

मागे

बाँब हल्ल्यांनंतर श्रीलंकेत चेहरा झाकण्यावर बंदी
बाँब हल्ल्यांनंतर श्रीलंकेत चेहरा झाकण्यावर बंदी

मुस्लीम महिलांचा बुरखा किंवा निकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणू....

अधिक वाचा

पुढे  

केरळमध्ये आत्मघाती हल्ल्याची होती तयारी, आयसीसचा म्होरक्या ताब्यात
केरळमध्ये आत्मघाती हल्ल्याची होती तयारी, आयसीसचा म्होरक्या ताब्यात

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसीसच्या केरळमधल्या कारवायांचा म्होरक्य....

Read more