ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्रीलंका बॉम्बस्फोट : कोलंबोत आणखी दोन बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा 185 वर, 500 हून अधिक जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीलंका बॉम्बस्फोट : कोलंबोत आणखी दोन बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा 185 वर, 500 हून अधिक जखमी

शहर : विदेश

श्रीलंकेत ऐन ईस्टरच्या दिवशी सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी हे ब्लास्ट झाले आहेत. यामध्ये तीन चर्च आणि तीन हॉटेलचा समवेश आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता ही घटना घडली. या धमक्यात एकूण 185 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. जखमी लोकांना कोलंबोतील दवाखान्यात दाखल केले जात आहे. हॉटेल शांग्रीला, हॉटेल किंग्सबरी आणि हॉटेल सिनामन या तीन हॉर्लटेसह सेंट ऍंथोनी, सेंट सेबास्टिन, सेंट बट्टीकलोआ या तीन चर्चमध्ये हे ब्लास्ट झाले. ईस्टर सणानिमित्त चर्चमध्ये यावेळी प्रार्थना सुरु होती. सर्वात पहिला धमाका हॉटेल शांग्रीलामध्ये झाला. मात्र अजूनही मृत लोकांच्या संख्येची पक्की माहिती मिळालेली नाही. कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दुपारनंतर आणखी दोन स्फोटांनी हादरले कोलंबो

रविवारी सकाळी झालेल्या सहा साखळी बॉम्बस्फोटानंतर दुपारी कोलंबोत आणखी दोन स्फोट झाले. सायंकाळी 6 वाजेनंतर कोलंबोत संचारबंदी लागू करण्याची श्रीलंकेच्या संरक्षण मंत्री रूवान विजेवर्धने यांनी घोषणा केली.

35 परदेशी नागरिकांचा समावेश

या साखळी बॉम्बस्फोटात 185 पेक्षा अधिक नागिरक मृत्युमुखी पडले असून त्यात 35 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ईस्टर संडे निमित्त ते येथील चर्चमध्ये आले होते. परदेशी नागिरकांना निशाण्यावर ठेवून हा स्फोट घडविण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांकडून समजते आहे.

भारतातही हायअलर्ट

आम्ही कोलंबोतील भारतीय उच्च-आयुक्तांच्या संपर्कात असून भारत श्रीलंकेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारतातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागे

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात 156 ठार तर 400 जखमी
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात 156 ठार तर 400 जखमी

 श्रीलंकेत तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यत 156 ....

अधिक वाचा

पुढे  

ऑनलाईन पेमेंट द्वारे अर्बन बॅंकेला  68 लाखांचा गंडा
ऑनलाईन पेमेंट द्वारे अर्बन बॅंकेला 68 लाखांचा गंडा

कोल्हापुरातील अर्बन बँकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखाचा गंडा घालण्यात आल....

Read more