ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

धक्कादायक! लग्न करून प्रेमी युगुलाची आत्महत्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 04:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धक्कादायक! लग्न करून प्रेमी युगुलाची आत्महत्या

शहर : वाशिम

वाशिममधील शुक्रवार पेठेत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आशिष ठाकूर (28) आणि कान्होपात्रा राऊत (22) या दोघांनी बंद असलेल्या आखाड्यामधे गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिष आणि कान्होपात्रा यांचे एकमेकांवर प्रेम होते. या दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वाशिमधील महाराणा प्रताप चौकाजवळ आशिष आणि कान्होपात्रा एकमेकांच्या शेजारी राहत होते. दोघांचेही एकमेंकावर प्रेम होते. परंतू त्यांच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला होता. सोमवारी पहाटे दोघांनीही एका बंद असलेल्या आखाड्यामधील लोखंडी खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कान्होपात्राच्या गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे आणि भांगामधे कुंकू भरलेले आढळून आल्याने दोघांनी आत्महत्येपूर्वी लग्न केले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

मागे

नंदुरबारमध्ये पोलिसांवर हल्ला, 2 पोलिस जखमी 
नंदुरबारमध्ये पोलिसांवर हल्ला, 2 पोलिस जखमी 

नंदुरबारमध्ये नगाव येथे हाणामारीचे प्रकरण सोडविण्यात गेलेल्या पोलिसांवर....

अधिक वाचा

पुढे  

प्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या
प्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या

नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. या हत्याकांड....

Read more