ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

किरकोळ कारणावरुन दोन भावात वाद, रागाच्या भरात छोट्या भावाकडून मोठ्या भावाची हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

किरकोळ कारणावरुन दोन भावात वाद, रागाच्या भरात छोट्या भावाकडून मोठ्या भावाची हत्या

शहर : सोलापूर

रागाच्या भरात एका छोट्या भावाने आपल्याच मोठ्या भावाची हत्या केलीय. सोलापुरातील तक्षशिला नगर, कुमठा नाका परिसरात ही घटना घडलीय. रोहित बनसोडे असे मयत तरुणाचे नाव असून त्याचा लहान भाऊ राकेश बनसोडे याने ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी राकेश बनसोडे याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.

मयत रोहित बनसोडे आणि राकेश बनसोडे हे दोघे भाऊ एकत्रित राहत होते. रविवारी (4 ऑक्टोबर) रोजी दुपारच्या सुमारास रोहित आणि राकेश यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झालं. आरोपी राकेश याने मोठा भाऊ रोहित याला 'तू वाईट संगतीतील मुलांसोबत का फिरतो?' अशी विचारणा केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. मयत रोहित याने आरोपी राकेश याला हाताने मारहाण केली. यावेळी आरोपी राकेश हा रागाच्या भरात घरातून निघून गेला.

रात्री 1.30 च्या सुमारास मयत रोहित बनसोडे याचा मित्र सुरज कसबे हा घरी आला होता. सुरज याने रोहित याला आवाज दिला मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी सुरज याने पाठीमागील भिंतीवरुन घरात प्रवेश केला असता रोहित हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. सुरज कसबे याने घाबरुन ही माहिती पोलिसांना कळवली. नियंत्रण कक्षाद्वारे ही माहिती कळवल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

मयत रोहित बनसोडे हा आपला मोठा भाऊ असून तो वारंवार आपला अपमान करत होता. किरकोळ कारणावरुन मारहाण करत होता. रविवारी देखील रोहित याने मारहाण केली होती. त्याच रागात आपण घरातील लोखंडी बटाने डोक्यावर मारहाण केली. अशी कबुली आरोपी राकेश बनसोडे याने दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात भांदवि 302, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि सोळुंके हे करत आहेत.

पुढे  

...तर दंगली भडकल्या असत्या, हाथरस प्रकरणी यूपी सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा
...तर दंगली भडकल्या असत्या, हाथरस प्रकरणी यूपी सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा

उत्तर प्रदेशच्या हाथरस (Hathras News) इथं झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकर....

Read more