ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ठाण्यात ट्रकने ५ जणांना चिरडले

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 28, 2020 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाण्यात ट्रकने ५ जणांना चिरडले

शहर : ठाणे

           वसई : ठाण्याहून वसईत जाणार्‍या एका ट्रकने रस्त्यावर झोपलेल्या पाच जणांना चिरडले. या अपघातात १ जण ठार झाला असून अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन मोटारसायकल आणि फळांच्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर ट्रकच्या पुढच्या भागाचेही नुकसान झाले आहे. 

        या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सदरहू ट्रक ठाण्याहून वसईकडे जात होता. ट्रक चालकाने मद्यपान केलेले होते. काल रात्री साडेअकराच्या सुमारास या चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रक कठड्याला धडकला. या कठड्यावर झोपलेल्या ५ जणांना ट्रकने चिरडले. ही घटना घडताच आरडा-ओरड, किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिक तेथे धावले. त्यांनी  ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी ट्रक चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. अपघातातील मृत्यू पडलेल्या तरुणाची ओळख पटली नाही. 

मागे

टी.व्ही. अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या 
टी.व्ही. अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या 

       मुंबई - मीरा रोड येथे राहणाऱ्या टी. व्ही. अभिनेत्री सेजल शर्मा हिने....

अधिक वाचा

पुढे  

कुख्यात गुंड अरुण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धाव 
कुख्यात गुंड अरुण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धाव 

         नवी दिल्ली : कुख्यात गुंड अरुण गवळीला सुनावलेली जन्मठेपेची शिक....

Read more