ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य,14 कोटी पौंड किमतीच्या सोन्याची चोरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 01:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य,14 कोटी पौंड किमतीच्या सोन्याची चोरी

शहर : विदेश

इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य करण्यात येत असून गेल्या पाच वर्षात येथे राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांच्या घरातून चोरट्यांनी 14 कोटी पौंड किमतीचे सोने लुटल्याचे समोर आले आहे. बीबीसीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

दक्षिण आशियाई वंशाचे नागरिक लग्नात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याच ठरावीक वंशाच्या नागरिकांची घरं लुटली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत इंग्लंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर लंडनमध्ये सर्वाधिक 10.56 कोटी पौंड किमतीचे सोने चोरी झाली असून त्यानंतर ग्रेटर मॅनचेस्टरमधून 96 लाख पौंड किमतीचे सोने चोरण्यात आले. प्रामुख्याने या सर्व चोऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांच्याच घरात होत असल्याने पोलिसांनी हिंदुस्थानी नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी घरात सोने न ठेवता बँक लॉकर्स किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवावेत असा सल्लाही पोलिसांनी आशियाई लोकांना दिला आहे.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात 2017-18 मध्ये 3,300 चोरीच्या घटना घडल्या. त्यात 2.12 कोटी पौंड किमतीच्या सोने चोरीला गेले. त्यासाठी तर याच दरम्यान 16 लाख पौंड किमतीच्या 89 चोऱ्या ग्रेटर नोएडा सोन्यांची चोरी आणि ग्रेटर मॅनचेस्टरमध्ये 15 लाख पौंड किंमत असलेल्या सोन्याची चोरी झाल्याची 238 तक्रारी नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

पुढे  

पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकास मारहाण प्रकरणी  दोघा भावांना अटक
पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकास मारहाण प्रकरणी दोघा भावांना अटक

वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा राग मनात धरून दोन सख्ख्या भावांनी पोलीस ठा....

Read more