ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

साखरा धरणाच्या शेजारी आढळले घातक रसायन

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2020 04:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

साखरा धरणाच्या शेजारी आढळले घातक रसायन

शहर : पालघर

             डहाणू : वाणगाव ते चारोटी राज्य मार्गालगत असलेल्या साखरा धरणाशेजारी निर्जनस्थळी शेकडो टन घातक रसायन फेकणार्‍या टँकर चालकाला साखरा ग्रामस्थांनी पकडले. उपस्थितीत असलेल्या संतप्त जमावाने टँकरचालकास मारहाणही केली. 

        डहाणू नगर परिषद, बाडा पोखरण योजना, टॅप्स, एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या साखरा धरणाच्या सांडव्याजवळ घनकचरा टाकण्यात आल्याचे उघडकीस आले. नागरिकांना डोळ्यांत जळजळ जाणवू लागल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नव्हती, अशी माहिती वाणगाव पोलिसांनी दिली.

    बोईसर-पंचाळी तसेच चिंचणीहून वाणगाव मार्गे चारोटीकडे जाणारा राज्य मार्गावर रात्रीच्या सुमारास  धरणाशेजारी घातक रसायनाच्या दुर्गंधीचा त्रास जाणवू लागल्याने काही ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा गेले १५ दिवस-रात्रीच्या वेळेत बोईसर येथील कारखान्यांमधून आणलेले घातक रसायन टाकले जात असल्याचे स्थानिकांना आढळले. २७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एका बंद टँकरमधून घातक रसायन टाकत असताना चालक व त्यांच्यासह असलेल्या साथीदाराला पकडण्यात आले. अधिक चौकशीदरम्यान बोईसर येथील ‘सेरेक्स’ या कारखान्यातून हे घातक रसायन आणल्याचे चालकाने सांगितले.

मागे

अकोल्यात संपत्तीच्या वादातून वडीलांनी मुलाची गोळी झाडून केली हत्या
अकोल्यात संपत्तीच्या वादातून वडीलांनी मुलाची गोळी झाडून केली हत्या

              अकोला : अकोल्यातील जठारपेठ चौकात असलेल्या इंद्रायणी गती....

अधिक वाचा

पुढे  

आसामच्या एका नदीला भीषण आग: समाजकंटकांवर संशय
आसामच्या एका नदीला भीषण आग: समाजकंटकांवर संशय

              आसाम : आसामच्या डिब्रुगड परिसरात एका नदीला भीषण आग लागल्य....

Read more