ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'हिट अँड रन' प्रकरणात कारच्या धडकेत मुलीचा मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'हिट अँड रन' प्रकरणात कारच्या धडकेत मुलीचा मृत्यू

शहर : मुंबई

मुंबई - चुनाभट्टी येथे एक 'हिट अँड रन' प्रकरण शुक्रवारी रात्री समोर आले. रात्रीच्या वेळी काही लोक मद्यधुंध अवस्थेत एसंट कार घेऊन जात असताना कार चालकाचा तोल गेल्याने अर्चना पारठे या (२३) वर्षीय तरुणीला धडक देत गाडी फुटपाथ वर चढली. या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. तसेच कार चालकावर कारवाई व्हावी यासाठी तरुणीच्या नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात येथे सकाळपासून ठिय्या आंदोलन केले.  

दरम्यान, रात्री साडे नऊ वाजता धावजी केणी मार्गावरील साईबाबा मंदिरजवळील फुटपाथवर चालणाऱ्या तीन तरुणींपैकी अर्चना पारठे ही तरुणी होती. तसेच, या मध्ये आणखी दोघी मैत्रिणी जखमी झाल्या असून त्यांच्यावर जवळील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. वाहन चालकाला चुनाभट्टी पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले असून एकूण गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी आणि आमच्या मुलीला न्याय मिळालाच हवा तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही असे तरुणीच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह स्वीकारला असून गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अश नातेवाईकांना लागली आहे.  

मागे

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगाराने स्वतःच घेतली दया याचिका मागे
निर्भया बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगाराने स्वतःच घेतली दया याचिका मागे

निर्भया बलात्कार प्रकरणी सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा न्यायालयानं स....

अधिक वाचा

पुढे  

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका, सोमवारी सुनावणी
हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका, सोमवारी सुनावणी

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल....

Read more