ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 06, 2019 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर

शहर : देश

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळी नेल्यानंतर या आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेलंगणा पोलिसांनी चौघांचं एन्काऊंटर केलं. तेलंगणा पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.

हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला महिला डॉक्टरसोबत सामूहिक करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला जाळून मारण्यात आलं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती, तसंच पीडित महिलेला लवकर न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरु लागली होती.

२७ नोव्हेंबरला आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि  मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.

डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर तिला जाळण्यात आलं. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर आज त्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे.

 

 

 

मागे

बलात्कार पीडितेला जाळणाऱ्या पाचही आरोपींना अटक
बलात्कार पीडितेला जाळणाऱ्या पाचही आरोपींना अटक

उन्नावच्या बिहार स्टेशन क्षेत्रातील हिंदूनगर गावात एका बलात्कार पीडितेला....

अधिक वाचा

पुढे  

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई नको
हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई नको

हैदराबाद डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणीच्या चारही आरोपींचा ए....

Read more