ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट

शहर : चंद्रपूर

राजुरा अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण, तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व सात विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची वैद्यकीय अहवालात पुष्टी झाली आहे. पोलिसांनी चौदा जणांचा समावेश असलेले एक विशेष तपास पथक स्थापन केले होते. राजुरा अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी आज एक धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व सात विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे तपासाला बळ मिळणार आहे. सोबतच पोलिसांनी चौदा जणांचा समावेश असलेले एक विशेष तपास पथक या प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केले आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या चौकीदाराला देखील पोलिसांनी आज अटक केली असून आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. पीडित मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पुरावे गोळा करण्यासाठी केवळ महिला पोलीस कर्मचारी असलेल्या दोन पथकांनी वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींचे घरी जाऊन जबाब नोंदवीत आहेत. विशेष म्हणजे शाळेचे सर्व ट्रस्टी आज तपास पथकापुढे प्रथमच हजर होणार असून त्यांचे देखील जबाब नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.

मागे

285 रेल्वे दलालांवर कारवाई, दलालांकडून 2.36 लाखांचा दंड वसूल
285 रेल्वे दलालांवर कारवाई, दलालांकडून 2.36 लाखांचा दंड वसूल

गावी जाताना मेल-एक्स्प्रेसमध्ये कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी दलाल प्रवाशा....

अधिक वाचा

पुढे  

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात 156 ठार तर 400 जखमी
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात 156 ठार तर 400 जखमी

 श्रीलंकेत तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यत 156 ....

Read more