ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापूरात 69 गावठी बॉम्ब सापडले

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापूरात 69 गावठी बॉम्ब सापडले

शहर : कोल्हापूर

कोल्हापूर- कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावरील स्फोटाशी कोल्हापूर कनेक्शन समोर आले असतानाच कोल्हापूरातील माले मूडशिंगी गावात 69 गावठी बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, मतदाऩाच्या आधी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरातील उजळाई वाडी उड्डाणपुलाखाली बॉम्ब स्फोट झाला होता. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. तर मतदानाच्या दिवशीही कोल्हापूरात बॉम्ब स्फोट झाला होता.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी गावात राहणाऱ्या विलास राजाराम जाधव (52) आणि आनंद राजाराम जाधव (54) या दोघा भावांना अटक करुन त्यांच्याकडील 69 गावठी बॉम्ब हस्तगत केले आहेत. डुकरांची शिकार करण्यासाठी हे बॉम्ब बनविल्याची कबुली या दोघा भावांनी दिली आहे.

भुईबावडा,धुंदवडे येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा हे दोघे वापर करीत होते. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे ते बॉम्बची विक्रीही करीत असत.

 

मागे

हुबळीत स्फोट प्रकरणात शिवसेना आमदारच नाव आल समोर
हुबळीत स्फोट प्रकरणात शिवसेना आमदारच नाव आल समोर

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोट प्रकरणात कोल्हापूरमधी....

अधिक वाचा

पुढे  

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, ५ पोलिसांचे निलंबन
वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, ५ पोलिसांचे निलंबन

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात विजय सिंग या संशयिताच्या कोठडीतल्या मृत्....

Read more