ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात 156 ठार तर 400 जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 02:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात 156 ठार तर 400 जखमी

शहर : विदेश

 श्रीलंकेत तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यत 156 जण ठार झाले असून 400 हून अधिकजण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार 8.45 मिनिटांनी ईस्टर प्रार्थनेच्यावेळी हे स्फोट झाल्याचे पोलीस प्रवक्ता रुवन गुनासेकेरो यांनी सांगितले. हा हल्ला कोणी घडवून आणला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. कोलंबोतील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त श्रीलंकन मीडियाने दिले आहे.  3 चर्च आणि 3 फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा स्फोट झाला. कोलंबोच्या सेंट एंटॉनी चर्चमध्ये आणि नेगंबो शहरातील सेंट सेबस्टाईन येथे पहिला बॉम्बहल्ला झाला. या साखळी बॉम्ब हल्ल्यात 400 जण जखमी झाले असून हा आकडा वाढतच आहे. चर्चमध्ये बॉम्बहल्ला झाला असून या आणि मदत करा असे आवाहन अशी सेंट सेबस्टाईन चर्चने फेसबुक पोस्ट वरून केले आहे.

 श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करत भारतीय उच्चायुक्तांशी सतत संपर्कात असून, परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आलेत.+94777903082 +94112422788 +94112422789  आणि +94772234176 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाटीकोला चर्चमध्ये तसेच दोन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्फोट झाल्याचे डेली मिरर (श्रीलंका) ने म्हटले आहे.

ईस्टर डेच्या प्रसंगी प्रामुख्याने चर्चला लक्ष्य करण्यात आल्याचे यातून समोर येत आहे.

मागे

अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट
अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट

राजुरा अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण, तक्रार करण्यासाठी ....

अधिक वाचा

पुढे  

श्रीलंका बॉम्बस्फोट : कोलंबोत आणखी दोन बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा 185 वर, 500 हून अधिक जखमी
श्रीलंका बॉम्बस्फोट : कोलंबोत आणखी दोन बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा 185 वर, 500 हून अधिक जखमी

श्रीलंकेत ऐन ईस्टरच्या दिवशी सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. श्रीलंकेची राज....

Read more