ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ

शहर : गडचिरोली

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. आज मे रोजी राज्यात महाराष्ट्र दिवस साजरा होत असताना गडचिरोलीत जवळपास ५० वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. कुरखेडा तालुक्यातील दादापूर इथे रात्री अकरा ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पुराडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दादापूर इथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रस्ते बांधकाम जागेवर नक्षलवाद्यांनी २७ हून अधिक वाहनांना आग लावली. याच कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर अशा पन्नासहून अधिक वाहनांसह दादापूर इथल्या डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही जाळण्यात आले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नक्षलवाद्यांनी  अचानक झालेल्या या जाळपोळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

मागे

नारायण साईला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड
नारायण साईला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड

बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर आज कोर्टाने नारायण साईला आजीवन कारावा....

अधिक वाचा

पुढे  

सपा नेत्याची घरासमोरच गोळ्या घालून हत्या
सपा नेत्याची घरासमोरच गोळ्या घालून हत्या

अलीगडच्या हरदुआगंज भागात समाजवादी पक्षाचे नेते राकेश यादव यांची मंगळवारी (....

Read more