ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करणं अत्यावश्यक - सुप्रीम कोर्ट

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करणं अत्यावश्यक - सुप्रीम कोर्ट

शहर : देश

नवी दिल्ली-  तेलंगणा पोलिसांनी घेतलेल्या हैदराबाद चकमकीप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. हैदराबाद चकमकीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमण्याचा प्रस्ताव आहे. लोकांना सत्य समजलं पाहिजे. त्यामुळे हैद्राबाद एन्काऊंटरप्रकरणी चौकशी होणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये जागीच ठार झाले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणले होते. तपास सुरू असताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची त्यांची योजना होती. तेव्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असेलेले आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. परंतु लोकांना सत्य समजलं पाहिजे आणि त्यासाठी हैद्राबाद एन्काऊंटरप्रकरणी चौकशी होणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
 

मागे

आणखी दोघा नराधमांनी गतिमंद मुलीवर केला बलात्कार...
आणखी दोघा नराधमांनी गतिमंद मुलीवर केला बलात्कार...

बुलढाणा – खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरीमधील मानसिकरित्या कमजोर असलेल....

अधिक वाचा

पुढे  

मानवजातीची हद्द पार करणाऱ्या नराधमाला अटक; मातेलाच केली वासनेची शिकार
मानवजातीची हद्द पार करणाऱ्या नराधमाला अटक; मातेलाच केली वासनेची शिकार

             औरंगाबाद - संपूर्ण मानवजातीला लाज वाटेल अशी अत्यंत वाईट घ....

Read more