ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 15, 2021 09:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार

शहर : पुणे

पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. (pune police Arrested 20 year Old man For Raping Minor Girl in Vimannagar Pune)

विमानतळ पोलिसांनी नराधम आरोपीस अटक केली असून पीडित चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी करण दिलीपकुमार गोस्वामी (वय.२०, रा.विमाननगर) यास विमानगर पोलिसांनी केली अटक केली आहे.

आरोपी विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतो, तर पीडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत एका लेबर कॅम्पमध्ये राहते. तिचे आई-वडील दोघेही कामाला जातात. आई-वडील कामाला गेल्यानंतर पीडित चिमुरडी घरी एकटीच असते, हे आरोपीने हेरले.

दुपारी आरोपीने पाच वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरातून बाहेर बोलावले आणि तो काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या चिमुरडीवर सध्या पुण्यातील एका सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागे

लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!
लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!

शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणारा अभिनेता दीप सिद्धूला तब्बल 14 दिवसानंतर पोल....

अधिक वाचा

पुढे  

दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार
दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

औरंगाबाद (Aurangabad Crime) जवळच्या पळशी शिवारात पतीने पत्नीची निर्घृण हत्या (Husband Murdered His W....

Read more