ठळक बातम्या आयुर्वेदानुसार रुईच्या झाडाचे पान आहे आरोग्यासाठी फायदेमंद, हा गं’भी’र आजारही कायमस्वरूपी दूर करतो !.    |     टायफाइड असल्यास, हे उपाय केल्यानं मुळातून टायफाईड जाणार.    |     कापराच्या तेलाचे जादुई फायदे.    |     आर्थिक स्थिती मजबूत होईल जर घरात वाहणार सकारात्मक ऊर्जा.    |     हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध.    |    

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 11:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

शहर : औरंगाबाद

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात महिला सुरक्षित नाही असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण, औरंगाबादमध्ये बलात्काराची अंत्यत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सगळ्या भयंकर म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे. (rape on 7 year old girl in aurangabad)

औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तिने रोखण्याचा प्रयत्न केला असता नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला. यामध्ये चिमुकलीचा ओठ तुटल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, लहान वयात असा धक्कादायक प्रकार घडल्याने पीडितेला धक्का बसला आहे. तर आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

खरंतर, राज्यात महिला अत्याचारांचं प्रमाण काही केल्या कमी होत नाही. कुठल्याही क्षेत्रातच काय तर हल्ली मुली घरातही सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणं समोर आली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर यावर प्रशासनाने ठोस पाऊलं उचलायला हवीत असंही काहींचं म्हणणं आहे.

मागे

जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ
जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

जळगावमधून राज्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. रावेरमध्ये एकाचवेळी ....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित! दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात
महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित! दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात

राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने (NCRB) 2019 मधल्या महिला अत्याचाराच्या घटनां....

Read more