ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी मुख्यमंत्री एनडी तिवारींच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, पत्नीला अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी मुख्यमंत्री एनडी तिवारींच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, पत्नीला अटक

शहर : delhi

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचा १६ एप्रिल रोजी गूढ मृत्यू झाला होता. हा खून असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं होतं. या प्रकरणाचं गूढ दिल्ली पोलिसांनी उलगडलंय. बुधवारी दिल्ली पोलिसांनी रोहितची पत्नी अपूर्वी तिवारी हिला अटक केलीय. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शेखर तिवारी याची पत्नी अपूर्वी तिवारी हिनंच रोहितचा गळा दाबून त्याला ठार मारलं. सूत्रांच्या माहितीनुसार, अपूर्वानंच रोहितचा गळा दाबून त्याची हत्या केली. अपूर्वाच्या अटकेनंतर दिल्ली पोलीस या प्रकरणाची माहिती देण्यासाठी २.३० वाजता एक पत्रकार परिषद घेणार आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहितची पत्नी अपूर्वी वारंवार आपल्या जबाबात बदल करत होती. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई तिच्यावर स्थिरावली होती. ज्या दिवशी रोहितची हत्या झाली त्या दिवसाची माहिती देताना अपूर्वाचा गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील आणखी सहा जणांची चौकशी केली होती.

रोहित शेखर तिवारी हत्याकांड प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमला रोहित शेखरकडे दोन मोबाईल नंबर असल्याचं लक्षात आलं होतं. दोन्ही नंबरच्या कॉल डिटेल्सनुसार, शेखरचा एक फोन १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता तर दुसरा फोन १५ एप्रिल रोजी ९.३० वाजता बंद झाला होता. डिफेन्स कॉलनीमध्ये नेटवर्क नसणं हेदेखील यामागचं एक कारण असू शकतं. परंतु, यानंतर १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता एका क्रमांकावर मोबाईल कंपनीकडून एक मॅसेज दाखल झाला होता.

या प्रकरणात रोहितची आई उज्ज्वला यांनी अपूर्वी हिच्यावर गंभीर आरोप केले होते. रोहितच्या आईच्या म्हणण्यानुसार, अपूर्वा आणि तिच्या कुटुंबीयांची नजर आमच्या संपत्तीवर होती. यापूर्वी रोहितच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी उज्ज्वला यांनी रोहित नैराश्येत असल्याचं म्हटलं होतं. 

मागे

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी
श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (आयसिस) या दहशतवादी संघटनेने श्रीलंके....

अधिक वाचा

पुढे  

श्रीलंका पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, मोटारसायकलवर आढळली स्फोटकं
श्रीलंका पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, मोटारसायकलवर आढळली स्फोटकं

कोलंबोमध्ये सिवोय सिनेमाजवळ बुधवारी सकाळी आणखी एक स्फोट झालाय. मिळालेल्या ....

Read more