ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 20, 2021 11:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

शहर : सातारा

सातारा-पंढरपूर एसटी बसवर 10 ते 12 दरोडेखोरांनी दगडफेक केली (Satara-Pandharpur ST Bus Attack). त्यानंतर दरोडेखोरांनी एसटीवर ताबा मिळवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. माळशिरसजवळील पिलीव घाटात ही घटना घडली. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये फक्त चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 394, 427 आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये एसटी चालक, मोटारसायकल चालक आणि बसमधील काही प्रवाशी जखमी झाले. तसेच, दगडफेकीमुळे एसटीच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा-पंढरपूर रस्त्यावरील म्हसवड जवळच्या पिलीव घाटात 10 ते 12 अज्ञात दरोडखोरांनी एसटी आणि मोटरसायकल चालकावर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. मोटरसायकल चालक, बसमधील प्रवासी आणि बसचालक जखमी झाले. त्यानंतर या दरोडेखोरांनी गाडी थांबवत त्यावर ताबा मिळवला. तसेच, एसटीतील प्रवाशांना मारहाणसुद्धा करण्यात आली. या घटनेत एसटीच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं.

पंढरपूरमधून साताऱ्याकडे एसटी जात असताना ही घटना घडली. पंढरपूर-सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी रवाना झाले.

दरोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या हुल्लडबाजांनी ये-जा करणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, एसटीवर ही दगडफेक झाली असून, गाडीच्या काचा फुटल्या आहेत. माळशिरस आणि म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पंढरपूर-सातारा परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.

 

मागे

भंडारा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची धावपळ, 2 वर्षांपासून फायर ऑडिट नाही!
भंडारा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची धावपळ, 2 वर्षांपासून फायर ऑडिट नाही!

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. य....

अधिक वाचा

पुढे  

लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

लिव्ह-इन रिलेशनशिपसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर....

Read more