ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिर्डीमध्ये आईसह तीन मुलांना विषबाधा; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिर्डीमध्ये आईसह तीन मुलांना विषबाधा; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

शहर : अहमदनगर

अहमदनगर – शिर्डी य़ेथील संगमनेरातील आंबेडकरनगरमध्ये विषबाधेमुळे लहान बहिण आणि भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली असून यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आई आणि एका मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सुपेकर कुटुंबियांच्या घरी चार जणांना गुरूवारी जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिपक सुपेकर यांच्या पत्नीसह तीन मुलांना विषबाधा झाली. यात उपचारादरम्यान मुलगी श्रावणी वय (9 वर्षे) आणि मुलगा कृष्णा (वय 6 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर वैष्णवी नावाच्या 13 वर्षांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सगळ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण समजेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. तर अधिक तपास करण्यासाठी सुपेकर यांच्या घराचा तपास घेण्यात येणार असून जेवणाचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, अशा प्रकारे घरातील चिमुकल्यांना गमावल्यामुळे सुपेकर कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर गावात एकच खळबळ उडाली आहे. 

मागे

पुन्हा एका नराधमाने केले पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण आणि खून...
पुन्हा एका नराधमाने केले पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण आणि खून...

नागपूर - हैदराबाद व उन्नाव येथील घटनेनंतर नागपूर जवळच्या कळमेश्वरमध्ये म....

अधिक वाचा

पुढे  

तुरुंगाला दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश,16 डिसेंबरला फासावर लटकणार निर्भयाचे दोषी ?
तुरुंगाला दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश,16 डिसेंबरला फासावर लटकणार निर्भयाचे दोषी ?

दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील नराधमांना कधीही फासावर लटकवले जाऊ शकते. सुत....

Read more