ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवकाची हत्या

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवकाची हत्या

शहर : परभणी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवकाची हत्या करण्यात आली असुन अमरदीप रोडे असं नगरसेवकाचं नाव आहे. परभणी शहरातील जायकवाडी भागात हा प्रकार घडला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी स्वत: नवा मोंढा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्हाची कबुली दिली आहे. दरम्यान, अमरदीप रोडो यांची अधिक माहिती मिळाली असता त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या नावे अनेक गुन्हे आहेत. भांडण आणि दादागिरीमुळे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. अशाच एका वादातून त्यांची हत्या झाल्याचं शक्यता वर्तवली जात आहे तर पोलिसांनी घटनास्थळावरून अमरदिप यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

पुढे  

परवाना रद्द केल्याने केमिस्टकडून महिला अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या.
परवाना रद्द केल्याने केमिस्टकडून महिला अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या.

 पंजाबच्या खरडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलविंदर सिंह नावाच्या....

Read more