ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चोरट्यांचा राष्ट्रीय खेळाडूवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 15, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चोरट्यांचा राष्ट्रीय खेळाडूवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

शहर : नाशिक

राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी लूटमार करण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये निखिल जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या सर्व घटनेमुळे निखिलला दोन दिवसांनी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. मंगळवारी रात्री सराव करुन येत घरी जात असताना चोपडा लॉन्स येथील पेट्रोल पंपासमोर त्याला चोरट्यांनी रोखले. निखिलला लुटण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी निखिलला अडवले. मात्र त्याच्याकडे काहीच मिळाल्याने त्यांची निराशा झाली. निखिलकडे काहीच मिळाल्याच्या रागातून चोरट्यांनी निखिलवर कोयता आणि चाकून हल्ला करत बेदम मारहाण केली.नाशिक शहरात दिवसेंदिवस चोऱ्या, प्राणघातक हल्ल्याचे प्रकार वाढत असताना आता खेळाडूही असुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे क्रीडाक्षेत्रातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.

मागे

सायन हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार
सायन हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार

सायन रुग्णालयात एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समो....

अधिक वाचा

पुढे  

तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी,बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता
तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी,बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता

अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारत....

Read more