ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पोलिसांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलिसांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

शहर : srinagar

      श्रीनगर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्याच्या भावाला अटक करून तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जम्मू पोलिसांना यश आले आहे. 

          जम्मू पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव समीर डार असून त्याने गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास कठुआ जिह्यातील हीरानगर सेक्टरमधून तीन ते चार दहशतवाद्यांना ट्रकमध्ये बसविले. हे दहशतवादी राष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करून जम्मूमध्ये शिरले होते. हे सर्व दहशतवादी ट्रकमध्ये मागच्या बाजूला लपून काश्मीरला जात होते. हे दशतवादी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मोठा हल्ला घडविण्याच्या तयारीत होते. 

         ३१ जानेवारी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका टोलनाक्यावर चेकिंगदरम्यान पोलिसांना संशय आल्याने ट्रकची पाहणी करीत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळीच पोलीस सावध होऊन प्रत्युत्तर देत ट्रकमधील तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. त्या दहशतवाद्याकडून ५ रायफल, आरडीएक्स आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त करण्यात आली आहेत.  

मागे

विरारच्या म्हाडा कॉलनीत कुत्र्यांवर केले विषप्रयोग
विरारच्या म्हाडा कॉलनीत कुत्र्यांवर केले विषप्रयोग

            विरार : विरारच्या पश्चिम भागात म्हाडा कॉलनीमध्ये कुत्र्याच....

अधिक वाचा

पुढे  

वर्धामध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल ओतून जाळले
वर्धामध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल ओतून जाळले

      वर्धा : वर्धामधील हिंगणघाट परिसराजवळच नंदेरी येथे आज सकाळी ७:३० च्....

Read more