ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

TRP Scam | मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ‘या’ चॅनेलचा सर्व्हर जप्त, प्रसारणास बंदी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 26, 2021 07:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

TRP Scam | मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ‘या’ चॅनेलचा सर्व्हर जप्त, प्रसारणास बंदी

शहर : मुंबई

मुंबईच्या गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने (Criminal Interdiction Unit) मोठी कामगिरी केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपी महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे. त्यामुळे आता चॅनलला प्रसारण करता येणार नाही. दरम्यान या प्रकरणी दर्शन सिंह आणि विश्वजित शर्मा यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून पदार्फाश करण्यात आला होता. जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या कॉपीराईट प्रकरणात महामुव्ही विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर गुन्हे शाखेनेमहामुव्ही वाहिनीच्या प्रवर्तक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांना अटक केली होती. यानंतर आता महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील करण्यात आला आहे.

महामुव्हीपासून लावारिस, जंजीर, मोहब्बत के दुश्मन, मुकद्दर का सिकंदर आणि जादूगार अशा सिनेमाची कंटेंट जप्त केली आहे. यापूर्वी, बॉक्स सिनेमाच्या सर्व्हर आणि कंटेंटला गेल्या आठवड्यात सील करण्यात आला आले आहे. ते चॅनेलही यापुढे प्रसारित होणार नाही.

त्याशिवाय महामुव्ही चॅनलचा आर्थिक लेखापरीक्षण (financial audit) केले जाणार आहे. तसेच दर्शन सिंह यांच्यावर एलओसी (लुक आऊट नोटीस) जारी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

मागे

निवृत्त अधिकारी म्हणतो सही करण्याचा प्रश्नच नाही, पुणे पालिकेला 5 कोटींचा गंडा कोणी घातला?
निवृत्त अधिकारी म्हणतो सही करण्याचा प्रश्नच नाही, पुणे पालिकेला 5 कोटींचा गंडा कोणी घातला?

 महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक अभियंता संदीप खांदवे यांची बना....

अधिक वाचा

पुढे  

दिल्ली बाँबस्फोटाचं इराण कनेक्शन? कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्फोट?
दिल्ली बाँबस्फोटाचं इराण कनेक्शन? कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्फोट?

दिल्लीत काल इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या बाँबस्फोटाचे धागेदोरे शोधाय....

Read more