ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाळास जन्म देऊन आई फरार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 04:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बाळास जन्म देऊन आई फरार

शहर : यवतमाळ

सोमवारी रात्री ८ वाजता पांढरकवडा आगाराची बस (क्र. एमएच ०६ एस ८८२४) यवतमाळकरिता निघाली. मार्गातील प्रत्येक गावातून प्रवाशी बसमध्ये चढ-उतार करत होते. रात्रीची वेळ असल्याने चालकाने बसमधील दिवे बंद केले. या अंधारातच बसमधील एका गरोदर महिलेने कोणासही अंदाज न येऊ  देता मागच्या सीटवर एका बाळाला जन्म दिला. आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही, याची खात्री झाल्यानंतर ही महिला बाळास बसमध्येच सोडून पसार झाली. यवतमाळ बसस्थानकावर सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर वाहकाने बसमध्ये चक्कर मारली तेव्हा मागच्या सीटकडून रक्ताचा पाट वाहत असल्याचे आढळले. त्यांनी मागील आसनाखाली बघितल्यानंतर तिथे एक नवजात बाळ मृतावस्थेत आढळले.

यवतमाळ बसस्थानक प्रमुख उजवणे, सहायक वाहतूक निरीक्षक दिगंबर गावंडे, कर्मचारी जितेंद्र दवारे आणि सदर बसचे चालक- वाहक यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपूर्द केले. पोलीस अधिक तपास करीत असून त्या निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.

 

मागे

भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

गुजरातच्या नरोदा येथे भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला न....

अधिक वाचा

पुढे  

दुबईत भीषण बस अपघात- आठ भारतीयांचा मृत्यू
दुबईत भीषण बस अपघात- आठ भारतीयांचा मृत्यू

दुबईत झालेल्या भीषण बस अपघातामध्ये आठ भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स....

Read more