ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  उस्मानाबाद ला

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 05:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  उस्मानाबाद ला

शहर : उस्मानाबाद

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2020 मध्ये उस्मानाबाद येथे होणार आहे. अशी घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौटिकराव ठाले-पाटील यांनी आज दिली.

यासंदर्भात माहिती देताना ठाले-पाटील म्हणाले की , गेल्या 8 वर्षापासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेतर्फे साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये घेण्यासाठी मागणी करीत होते. उस्मानाबाद सारख्या ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेल्या शहरात यापूर्वी एकही संमेलन झालेले नाही.  यावेळी स्थळनिवड समितीने नाशिक आणि उस्मानाबाद येथील दोन संस्थांचीच पाहणीसाठी  निवड केली  होती. दोन्ही ठिकाणी भेट देऊन महामंडळाला अहवाल सादर केला. महामंडळाच्या अध्यक्षांनी वेळ खर्च होऊ नये म्हणून विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह सर्व सदस्यांना अहवालासह परिपत्रक पाठवून मते जाणून घेतली. सर्वानुमते उस्मानाबादची निवड करण्यात आली. जानेवारीत होणार्‍या या संमेलनाच्या तारखा उस्मानाबादकरांशी चर्चा करून निश्चित केल्या जातील , असेही शेवटी ठाले पाटील यांनी सांगितले.

मागे

प्रत्येक माणसाने शक्य होईल तेथे तेथे वाचन करावे- मिलिंद गुणाजी
प्रत्येक माणसाने शक्य होईल तेथे तेथे वाचन करावे- मिलिंद गुणाजी

"प्रत्येक माणसाने शक्य होईल तेथे तेथे वाचत राहिले पाहिजे". असे अभिनेते म....

अधिक वाचा

पुढे  

नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' पुस्तकाच्या प्रकाशनाला शरद पवार उपस्थित राहणार
नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' पुस्तकाच्या प्रकाशनाला शरद पवार उपस्थित राहणार

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या 'नो होल्ड्स बार्ड' या आत्....

Read more