ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाताळ सणाचं उत्साहाने स्वागत

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाताळ सणाचं उत्साहाने स्वागत

शहर : मुंबई

         मुंबई - डिसेंबर महिना उजाडल्यानंतर सर्वांनाच चाहूल लागते ती म्हणजे खिसमस अर्थान नाताळ सणाची. ख्रिस्त धर्मीयांसाठी अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या सणाची धूम यंदाच्या वर्षीही पाहायला मिळत आहे.फक्त ख्रिस्ती बांधवच नव्हे तर, सर्वजण या सणाच्या स्वागतासाठी आपआपल्या परिने सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


         ख्रिसमसच्या निमित्ताने पूर्वसंध्येला अनेक चर्चमध्ये खास मासचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नवे कपडे घालत आणि चेहऱ्यावर आनंदाची भावमुद्रा आणत अनेकांनी या मासला हजेरी लावली. महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, गोवा येथेही नाताळसणाची धूम पाहायला मिळत आहे. 


         ख्रिसमस निमित्त स्वप्ननगरी मुंबईलासुद्धा एक वेगळा साज चढला आहे. ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी उत्साहाला उधाण आलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारा वांद्रे-वरळी सी लिंक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध रंगाच्या विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. नाताळ सणाच्या निमित्ताने मुंबईतील चर्च तसंच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
 

मागे

दहिसर ‘कोकण महोत्सव’ जल्लोषात...
दहिसर ‘कोकण महोत्सव’ जल्लोषात...

               मुंबई - सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक क्षेत्रा....

अधिक वाचा

पुढे  

अनुज केसरकर यांना राष्ट्रीय गोमंतक पुरस्कार प्रदान
अनुज केसरकर यांना राष्ट्रीय गोमंतक पुरस्कार प्रदान

        गोवा - मडगाव येथे दिनांक २२ जानेवारी २०१९ रोजी तृतीय राष्ट्रीय गो....

Read more