ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहिसर ‘कोकण महोत्सव’ जल्लोषात...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 08:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहिसर ‘कोकण महोत्सव’ जल्लोषात...

शहर : मुंबई

               मुंबई - सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षे वाटचाल करीत असलेल्या 'यशोधन फाऊंडेशन' या शासनमान्यता संस्था आणि शिवसेना शाखा क्रमांक तीन येथे दहिसर पूर्व, वैशाली नगरातील अतिथी डेव्हलपर्स मैदानात यंदाच्या तिसऱ्या वर्षी कोकण महोत्सव धुमधडाक्यात पार पडला.


               दहा दिवसांच्या कालावधीत विविध भाषिक, सर्व जाती-धर्माच्या लोकांचा वाढता प्रतिसाद, आणि सहभाग मोठ्या प्रमाणात झालेला दिसून आला. महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. दुसरा दिवस कोकणचा अस्सल मालवणी भाषेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट गावचे ओम् वीरभद्र दशावतार नाट्य मंडळाचा गरुड गर्वहरण तुफानी प्रयोग खूपच गाजला. त्यावेळी बृहन्मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. 


               दरम्यान, तिसरा दिवशी नवतारुण्य आणि युवकांच्या जल्लोषात पार पडला. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोकण महोत्सवाचे आयोजन कौतुकास्पद आहे असे उद्गार दहिसर पोलिस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम.मुजावर यांनी काढले. तसेच चौथ्या दिवशी 'मान पैठणीचा किशोर सावंत यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला गेला. पाचव्या दिवशी कोळी समाज बांधव यांची कोळी नृत्य आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम असंख्य पाहुण्यांच्या उपस्थित पार पडला आणि स्थांनीकांनीही प्रचंड आनंद लुटला.  
 

मागे

सुलावेसी या द्वीपावर सापडले चक्क 44 हजार वर्षे जुने चित्र
सुलावेसी या द्वीपावर सापडले चक्क 44 हजार वर्षे जुने चित्र

           इंडोनेशिया - सुलावेसी या द्वीपावर एका गुहेत हजारो वर्ष जुने ....

अधिक वाचा

पुढे  

नाताळ सणाचं उत्साहाने स्वागत
नाताळ सणाचं उत्साहाने स्वागत

         मुंबई - डिसेंबर महिना उजाडल्यानंतर सर्वांनाच चाहूल लागते ती म्....

Read more